NCP Jan Sanman Yatra : मोहोळमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा रद्द; ‘हे’ आहे कारण...

Ajit Pawar Mohol Tour cancelled : मोहोळमधील नियोजित जनसन्मान यात्र रद्द करण्यात आली असली तरी आगामी काळात होणार आहे. पुढील कार्यक्रमाची वेळ आणि तारीखही लवकरच सांगण्यात येईल, असेही आमदार माने यांनी स्पष्ट केले.
NCP Jan Sanman Yatra
NCP Jan Sanman YatraSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 August : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोहोळ येथे उद्या (ता. 23 ऑगस्ट) होणारा नियोजित जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नाशिक येथील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमामुळे मोहोळमधील जनसन्मान यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे, असे मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाकडून राज्यात जनसन्मान यात्रेचे (Jan Sanman Yatra) आयोजन करण्यात आले आहे.

ही यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक लढवू शकणाऱ्या मतदारसंघातून जाणार आहे. त्याच अनुषंगाने येत्या शुक्रवारी (ता. 23 ऑगस्ट) मोहोळ येथे जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्या यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत नाशिक येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रमही उद्याच शुक्रवारी (ता. 23 ऑगस्ट) होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमवेतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे मोहोळ येथे होणारी जनसन्मान यात्रा रद्द करण्यात आली आहे.

NCP Jan Sanman Yatra
Raj Thackeray : राज ठाकरेंचा मोठा निर्णय; इतर पक्षातील बंडखोरांना मनसेची उमेदवारी देणार नाही

दरम्यान, मोहोळमधील नियोजित जनसन्मान यात्र रद्द करण्यात आली असली तरी आगामी काळात होणार आहे. पुढील कार्यक्रमाची वेळ आणि तारीखही लवकरच सांगण्यात येईल, असेही आमदार माने यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीसाठी ही जनसन्मान यात्रा वातावरण निर्मितीसाठी पक्षाच्या संभाव्या उमेदवारांना फायदेशीर ठरत आहे, त्यामुळे आपल्या मतदारसंघात ही यात्रा यावी, असा बहुतांश आमदारांचा आग्रह असल्याचे दिसून येत आहे.

इंदापुरात जनसन्मान यात्रेची सभा होणार

आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, तो कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी साडेनऊ पासून दौरा सुरू होणार आहे.

NCP Jan Sanman Yatra
Jayshree Patil : सांगली काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ; जयश्री पाटलांची कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढण्याची घोषणा

शुक्रवारी सकाळी साडेनऊला शिरसोडी ते तुगाव हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा करमाळा तालुक्यातील उजनी बॅक वॉटरमधील पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर इंदापूरमध्ये विविध कामांचे भूमिपूजन होणार आहे आणि दहा वाजता जनसन्मान यात्रेची सभा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com