Loksabha Election : 'वय 84 सभा 84, नाद करायचा नाही', जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : शरद पवार यांच्या क्षमते विषयी कोणी बोलू नये. त्यांच्या वया विषयी कोणी बोलू नये. त्यांनी स्वःताचे उदाहरण घालून दिले आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : लोकसभेच्या आखाड्यात सगळे नेते प्रचारात व्यग्र आहेत. विरोधकांकडून शरद पवार हे किती प्रचार करतील यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. शरद पवार यांच्या वयाचा मुद्द्यावर अजित पवार यांनी देखील टीका केली होती. मात्र, 22 दिवसांत शरद पवार हे 50 सभा घेणार आहेत. तर, लोकसभा निवडणुकीच्या घोषनेनंतरचा विचार केला तर शरद पवार हे 20 मे पर्यंत 84 पेक्षा अधिक सभा घेतील, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Sharad Pawar
MP Amol Kolhe Vs Ajit Pawar : अहो दादा, तर देशात इंजेक्शनचा तुटवडा पडेल ! असे कोण म्हणाले...

'वय 84 सभा 84. नादच करायचा नाही. शरद पवार (Sharad Pawar) व्यक्ती नाही विचार आहे' असे ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. जे कोणी बोलत आहे शरद पवारांना स्वतःला बारामती पुरेत बांधून घ्यावे लागेल. त्यांचे वय आहे 84. ते वर्धात सभा घेतली. त्यांनी विदर्भात तीन सभा घेतल्या. 20 मे पर्यंत त्यांच्या 84 सभा झाल्या असतील. आत्ताच त्यांच्या 25 सभा झाल्या आहेत, असे जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'शरद पवार यांच्या क्षमते विषयी कोणी बोलू नये. त्यांच्या वया विषयी कोणी बोलू नये. त्यांनी स्वःताचे उदाहरण घालून दिले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी हा माणूस महाराष्ट्रासाठी, पुरोगामित्व टिकवण्यासाठी जे करतो आहे. त्याची आठवण युगेनयुगे काढली जाईल. या वयात लोकांना भोवळ येते, थकवा येतो पण शरद पवारांना कधीच थकवा येताना पाहिला नाही', असे देखील आव्हाड म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी देखील अनेकदा जाहीर भाषाणामध्ये त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्यांचे कान टोचले आहेत. अजुन लय जणांना घरी पाठवायचे आहे, असे म्हणत त्यांना वयावरून बोलणाऱ्यांना त्यांनी सडेतोड उत्तर देखील दिले आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

Sharad Pawar
Sharad Pawar News : लेकीसाठी 8 धैर्यशील 6 अन् लाडक्या शशिकांतभाऊंसाठी 5 सभा, पवारांचा झंझावात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com