Kolhapur political news : स्थायी समितीत काँग्रेसच पडणार भारी, कोल्हापुरला 6 फेब्रुवारीला मिळणार महापौर

Maharashtra municipal elections News : येत्या 6 फेब्रुवारीला कोल्हापुराला नवा महापौर मिळणार आहे. या दरम्यान, उपमहापौर पदाची देखील निवड होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : येथील महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सध्या सुरु आहे. या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोल्हापूर महापलिकेच्या महापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीला विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. याच दिवशी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या 6 फेब्रुवारीला कोल्हापुराला नवा महापौर मिळणार आहे. या दरम्यान, उपमहापौर पदाची देखील निवड होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

महापौरपदाच्या आरक्षण निश्चितीनंतर ३० किंवा ३१ जानेवारीला महापौर, उपमहापौर निवडीसाठी नूतन नगरसेवकांची पहिली सभा घेतली जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे महिनाअखेरपर्यंत शहराला महापौर मिळणार, असे दिसत होते. त्यासाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे सभेसाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. महायुतीनेही आघाडी नोंदणीबरोबरच पदे वाटपासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. दोन दिवसांत त्यासाठी नेत्यांच्या बैठका होणार आहेत. त्यानंतर पुणे येथे विभागीय आयुक्तालय येथे या नुतन नगरसेवकांच्या नोंदणी होणार आहे. त्यानंतर महापौर निवडीच्या प्रक्रियेला गती येणार आहे.

Kolhapur Municipal Corporation
NCP SP Leader : पवारांच्या नेत्याचा मोठा दावा; ‘ज्यांनी ज्यांनी माझा पराभव केला, ते पुढे आमदार झाले’

महापालिकांच्या निवडणूक एकत्रित झाल्यानंतर महापौर निवडीही एकाच दिवशी करण्याचे राज्य सरकारचे नियोजन दिसत आहे. त्यासाठी तात्पुरता कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार नवीन नगरसेवकांची महापौर, उपमहापौर निवडीची सभा घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तारीख व वेळ निश्चितीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. विभागीय आयुक्तांनी आज किंवा रविवारी निश्चित करून पीठासीन अधिकारी नियुक्त करायचे आहेत. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीठासीन अधिकारी होतील, असे दिसते.

Kolhapur Municipal Corporation
BJP Mayor : काँग्रेसच्या हातातून महापालिका गेली, भाजपने सत्तागणित जुळवले; प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!

महापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीला विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे महायुतीमधील हालचालींनी वेग घेतला आहे. भाजप, शिवसेनेने गटनेता, सभागृह नेता निवडण्यासाठी तसेच आघाडी नोंदणी तत्काळ करून घेण्यासाठी बैठक घेतली. सर्वांची कागदपत्रे एकत्रित करून नोंदणीसाठी पाठवली जात आहेत.

Kolhapur Municipal Corporation
Shivsena Vs BJP : सोलापुरात मोठी घडामोड; शिवसेनेच्या उमेदवाराची निवडणुकीतून तडकाफडकी माघार, माजी मंत्री म्हेत्रेंना धक्का

समितीवरील सदस्य संख्या निश्चित

कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आल्यानंतर महापालिकेतील समितीवर सर्वाधिक संख्या ही काँग्रेस नगरसेवकांची असणार आहे. स्थायी समिती, परिवहन आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये या नगरसेवकांची निवड होणार आहे. स्थायी समितीमध्ये सर्वाधिक काँग्रेसला 7, भाजप 5, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 1 अशी सदस्य संख्या असणार आहे. मात्र जनसुराज्य शक्ती पक्ष कोणाला पाठिंबा देणार यावरून सदस्य संख्या आणखी बदलली जाऊ शकते. परिवहन समितीमध्ये काँग्रेस 5, भाजप 4, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 1 तर महिला व बालकल्याणमध्ये काँग्रेस 4, भाजप 3, शिवसेना 2 अशी सदस्यांची निवड होऊ शकते.

Kolhapur Municipal Corporation
Congress Star Campaigner : काँग्रेसने एक माजी मुख्यमंत्री, 6 खासदार, 8 आमदारांसह 40 नेत्यांना उतरवले ZPच्या आखाड्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com