Kolhapur NCP: पक्षाकडून आमचा विचार होत नाही! ठाकरेंच्या सेनेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील तक्रारी वाढल्या

Kolhapur NCP: प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रदेश प्रवक्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून दाखवला.
Shashikant Shinde
Shashikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur NCP: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिवसैनिकांच्या तक्रारी वाढत असताना कोल्हापुरात आणखी एका पक्षाची अवस्था तीच बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोणतीच दखल पक्षाकडून घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रदेश प्रवक्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून दाखवला.

Shashikant Shinde
पिवळी पगडी अन् भगतसिंग : एक मिथक; इतिहासतज्ज्ञ काय सांगतात?

पक्षाकडून सहकार्य मिळत नाही, आमचा विचार करत नाही, आता ठोस भूमिका घ्यावी’, अशा तक्रारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केल्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडं केल्या. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीचा अहवाल सादर केला. प्रदेशकडून कोणतेही सहकार्य झाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक नियुक्त केले आहेत. त्या निरीक्षकांना जिल्ह्याला भेट देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. लवांडे यांनी ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्याची बैठक घेतली.

Shashikant Shinde
Rajya Sabha Elections : राज्यसभेचा तिढा वाढला! ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच नेत्यांमध्ये रस्सीखेच; शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष!

यावेळी बोलताना लवांडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा प्रश्‍नच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा. उत्तर किंवा दक्षिण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून काम करा’, अशी सूचना प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी शहरातील कार्यकर्त्यांना दिल्या. दोन पक्ष एकत्र करण्याच्या प्रक्रियेमुळे थोडा गोंधळ झाला. आता अजित पवार नाहीत, त्यामुळे पक्ष एकत्रित करण्याचा प्रश्नच येत नाही. सरचिटणीस गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले.

Shashikant Shinde
PM Modi on LPG: भारत किती LPG आयात करतो? सध्या देशात पेट्रोल-डिझेलचा किती राखीव साठा? मोदींनी लोकसभेत स्पष्टच सांगितलं

पद्मजा तिवले यांनी पदाची अपेक्षा न करता पक्ष स्थापनेपासून काम करतो आहोत, परंतु प्रत्येक वेळेला पक्ष आमचा विचार करत नसल्याची खंत बोलून दाखविली. जिल्ह्याच्या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी कार्यकर्ते विविध पक्षांत जाऊन निवडून आले आहेत. त्यांना पक्षात काम करतील किंवा नाही याबाबत विचारावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी राजीनामे दिले आहेत त्या ठिकाणी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी नियुक्ती करावी लागेल, असंही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com