Kolhapur Politics : उद्धव ठाकरेंचा शहरप्रमुख काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक झाल्याने राडा; घरात जाऊन शिवसैनिकांनी विचारला निष्ठेचा जाब!

Shiv Sena UBT internal conflict News: या निवडीनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राडा घातला आहे. या प्रकारनंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारला आहे. त्यामुळे वातावरण चँगलेच तापले आहे.
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnam
Published on
Updated on

Kolhapur News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्मण झाला आहे. या निवडीनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राडा घातला आहे. या प्रकारनंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारला आहे. त्यामुळे वातावरण चँगलेच तापले आहे.

परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावल्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर सुनील मोदी यांनी तुम्ही शिवसेनेचा (Shivsena) घात केला, शिवसेनेत राहून तुम्ही काँग्रेसचे हस्तक झाला आहात, कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंची शिवसेना मोदी तुम्ही संपवली असा आरोप करण्यात आला.

Kolhapur News
BJP News : भाजप आमदाराला हृदयविकाराचा त्रास : रुग्णालयात उपचार सुरु; CM फडणवीसांनी विमानचे टेकऑफ थांबवून केली चौकशी

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसैनिकांकडून सुनील मोदी यांच्या घरात जाऊन जाब विचारला आहे. तुम्ही गुलाल धुवून या, मग शिवसैनिकांशी बोलणी करा, येथून पुढे काँग्रेससोबत कोणतीही आघाडी करणार नाही. काँग्रेसने नेहमीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा उपयोग केला, असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

Kolhapur News
Shiv Jayanti 2026 : पुण्यातील शिवभक्तांसाठी मोठी बातमी! महापौर मंजुषा नागपुरेंच्या आदेशानंतर मिरवणूक मार्गात बदल

कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे. विशेषता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद या निमित्ताने उफाळून आला आहे. त्यामुळेच सुनील मोदी यांची निवड होताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी राडा घातला आहे.

Kolhapur News
Shivsena UBT On AI summit : 'त्याची खंत भक्तांना आहे, ना मोदींना...; परंतु गलगोटियाच्या बनावटगिरीने जगभरात भारताची 'छीथू' झाली त्याचे काय?'

दरम्यान, शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ऑडियो बॉम्ब फुटला आहे. महापालिकेत काँग्रेसच्या दोन स्वीकृत नगरसेवक नेमणुकीवर शिवसेना नेते सुनील कदम यांनी आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि शहर प्रमुख सुनील मोदी आणि काँग्रेसचे मुस्ताक मलबारी यांच्या नावाला विरोध केला असून मोदी यांनी भ्रष्ट्राचार तर मलबारी यांनी महापालिकेचे पैसे थकवाल्याचा आरोप केला. या आरोपानंतरही स्वीकृत नगरसेवकपदी सुनील मोदी यांची निवड करण्यात आल्याने ठाकरे यांच्या शिवसैनिकात नाराजी आहे.

Kolhapur News
NCP merger discussion : विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते; रोहित पवारांच्या दाव्यावर दिली त्यांनी मोठी कबुली, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com