Sabhapati election : चमकत्काराच जनसुराज्यला तारणार, सभापती निवडीत राष्ट्रावादीच ठरणार भारी

Jan Surajya party role in Sabhapati election: महायुतीत एकत्र असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तणाव पाहायला मिळाल्यानंतर आता पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्षात संघर्ष होताना दिसत आहे.
Sabhapati election; vinay kore savkar
Sabhapati election; vinay kore savkarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी चुरस वाढली असून निवड चिठ्ठीद्वारे होण्याची शक्यता आहे.

  • जनसुराज्य आणि शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी आघाडीला प्रत्येकी चार जागा मिळाल्याने पेच निर्माण झाला आहे.

  • जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सभापतींची नावे निश्चित झाली असून दुपारपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Kolhapur Political News: जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर आता अध्यक्ष उपाध्यक्षबाबत महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. अशातच पंचायत समिती सभापतीपदावर कोणाची मोहर उठणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील बारा पंचायत समिती सभापतींची निवड होणार आहे. जवळपास 11 तालुक्यातील संभाव्य सभापती निश्चित झाले आहेत. पण शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापतीची निवड ही चिठ्ठीवर केली जाणार आहे.

शाहूवाडी पंचायत समित सभापतीपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. या तालुक्यात 'जनसुराज्य' व शिवसेना ठाकरे-राष्ट्रवादी आघाडीला प्रत्येकी चार जागा आहेत. कोरे-मुश्री यांच्यातील ताणलेले संबंध आणि पारंपरिक विरोधक पाहता या ठिकाणी चिठ्ठीवर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आता जनसुराज्यने पन्हाळा बालेकिल्ला गमावल्यानंतर आता शाहूवाडीमध्ये केवळ नशीबच त्यांना तारेल अशी चर्चा होताना दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक २० जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पंचायत समिती सभापती निवडीत राहणार आहे. जिल्ह्यातील 12 पैकी किमान चार तालुक्यांतील पंचायत समिती सभापतीपदावर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील. जनसुराज्य शक्तींचा बालेकिल्ला असणारा पन्हाळा तालुका यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर डॉ. विनय कोरे यांची सत्ता खालसा झाली आहे. अनेक वर्षांची जनसुराज्यचे आमदार डॉ. विनय कोरे यांची, तर करवीरमधील काँग्रेसची सत्ता यावेळी खालसा होणार आहे.

Sabhapati election; vinay kore savkar
NCP News : पुणे जिल्हा ताब्यात घेण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपचा फक्त एक सभापती : 10 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच ‘दादा’

जिल्ह्यातील चार पंचायत समिती सभापतिपदावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सभापती बसणार आहे. आजरा, चंदगड, हातकणंगले व शिरोळ पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण ज्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे, त्या प्रवर्गातील एकमेव सदस्य विजयी झाल्याने त्यांना संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीचा गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह करवीरमधील सभापतिपदावरील विजय निश्चित आहे. शिवसेनेला भुदरगड व पन्हाळ्यात, काँग्रेसला राधानगरी व गगनबावड्यात, तर भाजपला हातकणंगले व कागलमध्ये सभापतिपदावर विजय निश्चित आहे.

संभाव्य सभापती असे

गडहिंग्लज - प्रतिभा चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)

आजरा - जयश्री गाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंदगड - विलास नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)

करवीर - निवास पाटील, विलास भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)

भुदरगड - विक्रम पाटील (शिवसेना)

पन्हाळा- रवी पाटील (शिवसेना)

हातकणंगले - अश्विनी बिरांजे (भाजप)

कागल - सुनिता माळी (भाजप )

गगनबावडा- छाया देसाई (काँग्रेस )

राधानगरी - आर वाय पाटील (काँग्रेस)

शिरोळ - मिलिंद कुरणे (राजर्षी शाहू आघाडी)

शाहूवाडी - चिट्ट्यांवर निकाल होणार

Sabhapati election; vinay kore savkar
Vidhan Parishad Sabhapati Maharashtra Election: विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा ठरला; 'या' नावावर शिक्कामोर्तब

FAQs :

1. शाहूवाडी पंचायत समिती सभापतीपदावर पेच का निर्माण झाला आहे?
कारण दोन्ही गटांना समान म्हणजे चार-चार जागा मिळाल्यामुळे सभापती निवड चिठ्ठीद्वारे होण्याची शक्यता आहे.

2. शाहूवाडी पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण कोणासाठी आहे?
हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे.

3. कोणते पक्ष आमनेसामने आहेत?
Jansurajya Party आणि Shiv Sena ठाकरे गटासह Nationalist Congress Party आघाडी.

4. ही निवडणूक कोणत्या जिल्ह्यात होत आहे?
ही निवडणूक Kolhapur जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी होत आहे.

5. सभापती निवड कशी होणार?
समान संख्याबळ असल्यामुळे अंतिम निर्णय चिठ्ठी काढून होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com