Laxman Hake : बारामतीची पोटनिवडणूक लढविण्याबाबत लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान; ‘शेकडो कॉल आलेत, मी उद्या बारामतीला जातोय ’

Baramati By Election 2026 : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना बारामती पोटनिवडणूक लढवावी म्हणून शेकडो कॉल आले आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच निवडणूक लढवायची की नाही, याबाबत ते अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Sangola, 16 March : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी; म्हणून मला शेकडो कॉल आले आहेत. पण, बारामती परिसरातील कार्यकर्त्यांना भेटून ‘मीच पोटनिवडणूक का लढवावी, असं त्यांना वाटतंय. याबाबत त्यांच्याशी चर्चा करेन. चर्चेनंतर मी माझी भूमिका जाहीर करेन’ अशी भूमिका ओबीसी आंदेालक लक्ष्मण हाके यांनी मांडली.

लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, मी सर्वसामान्य कुटुंबातील ओबीसी आंदोलक आहे. ही अनुकंपेवर आधारित असणारी पोटनिवडणूक आहे. निवडणुका होणं, ही लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. निवडणुका बिनविरोध होणार असतील, तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो.

आंदोलनं, उपोषणं करून सरकार आमच्याकडे लक्ष देत नसेल तर निवडणुकाच्या माध्यमातून प्रश्न जनतेसमोर घेऊन जातात. बारामती (Baramati) परिसरातील कार्यकर्त्यांना मीच निवडणूक का लढवावी किंवा त्यांचा आग्रह आहे, याबाबत त्यांच्याशी चर्चा करेन, असेही हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

ते म्हणाले, वर्षभरापूर्वी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिलेले आहे. पण बारामतीमधील इतर संस्था बाजूला ठेवून अहिल्यादेवींचे नाव दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास अजितदादांचं नाव देण्याचा जीआर निघालेला आहे. आम्ही त्याबाबत आंदोलन करून आवाहन केले, पण त्यावर एकही प्रतिक्रिया आलेला नाही, त्यामुळे लोकांच्या मनात भावना असू शकतात.

अजित पवारांसोबत आमचे वैचारिक मतभेद होतेच. आम्ही सत्ताधाऱ्याविरुद्ध लढत होतो. आमची वैयक्तिक दुश्मनी असण्याचे काही कारण नाही. आमची ही वैचारिक लढाई असून आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे ही निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनात एक व्यापक बैठक घेऊ आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवू, असेही हाके यांनी स्पष्ट केले.

Laxman Hake
Bramati By Election : बारामती पोटनिवडणुकीचे बिनविरोधच्या दिशेने एक पाऊल : भाजपचा पुढाकार, स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांची भूमिका पुढे नेणार...

आम्ही निवडणुकीला बाय द्यायचा का? अन कुठली संवदेनशीलता? अजितदादांच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेता आणि आम्ही संवेदनशीलता पाळायची का? आम्हालाही वेदना आहेत. मी मागंही म्हटलं आहे की, अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला, त्या दिवशी कुठल्याही माणसाला जेवण गेलं नाही. हे महाराष्ट्राचं समाजमन आहे. आणि तुम्ही तिसऱ्या दिवशी शपथ घेताय, असा सवालही हाकेंनी केला.

ते म्हणाले, बारामतीत मला आजच बोलावत होते. पण मी उद्या (ता. १७ मार्च) बारामती तालुक्यात जाणार आहे. काही लोकांशी चर्चा करतोय, निवडणूक कोणी लढवायची, उमेदवार कोण असेल. हे चर्चेतून बाहेर येईल. पवार राजकारणात प्रोफेशनल वागत असतील तर आम्ही कसं वागायचं, हे जनतेला विचारू.

Laxman Hake
Dhangar Reservation News : रामराव वडकुते राज्यसभेवर गेले, अन् दीपक बोऱ्हाडेंनी धनगर आरक्षणाचा लढा तीव्र केला!

ओबीसीचे प्रश्न, पंचायत राजमधील ओबीसीचं आरक्षण संपलेले आहे, हे आम्ही दाखवून देऊ. ओबीसीच्या जागेवर इतर कसे निवडून आले, याचं ऑडिट आम्ही सरकारला विचारू. पवारांनी किती मूळ ओबीसी तिकिट दिलं, हे आम्ही जनतेला वाचून दाखवू. ओबीसीच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवू, असेही हाके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com