Laxman Hake : "विखे-जरांगेंमध्ये सेटलमेंट, ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, आरक्षण संपलं..."; मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर लक्ष्मण हाके संतापले

Laxman Hake on Radhakrishna Vikhe and Manoj Jarange : "राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात 'सेटलमेंट' झाली आहे. ही सेटलमेंट मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणंचं ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपलं आहे."
 Laxman Hake, Radhakrishna Vikhe Patil, Manoj Jarange Patil
OBC leader Laxman Hake criticizes the Maharashtra government, alleging a political settlement between minister Radhakrishna Vikhe Patil and Maratha reservation activist Manoj Jarange.Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात 'सेटलमेंट' झाल्याचा गंभीर आरोप करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवाय विखे आणि जरांगे यांच्यातील सेटलमेंट मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी हे सर्व आरोप आणि टीका मराठा उपसमितीच्या बैठकीतून समोर आलेल्या माहितीवरून केली आहे. गुरूवारी (ता.०५) मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्याची माहिती दिली.

तसंच राज्यभरात लाखो कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं. शिवाय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले असून आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरी दिल्याची माहिती देखील या बैठकीतून देण्यात आली आहे. तर याच सर्व मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला.

 Laxman Hake, Radhakrishna Vikhe Patil, Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा आंदोलनाबाबत मोठी बातमी! लाखो कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप : आंदोलकांवरील गुन्हे मागे, वारसांना नोकरी अन् 10 लाखांची आर्थिक मदत...

साम टीव्हीशी बोलताना हाके म्हणाले, "राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात 'सेटलमेंट' झाली आहे. ही सेटलमेंट मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणंचं ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपलं आहे.

 Laxman Hake, Radhakrishna Vikhe Patil, Manoj Jarange Patil
Sukhoi-30MKI Crash : देश हादरला! रडारवरून अचानक गायब झालेलं हवाई दलाचं सुखोई-30 लढाऊ विमान कोसळलं; दोन्ही वैमानिकांचा मृत्यू

नव कुणबी बनलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून या जागा ढापल्या आहेत. शिंदे असतील पवार असतील या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण संपवलं.", अशा शब्दात हाकेंनी आपला संताप व्यक्त केला. तर महाराष्ट्रातल्या ओबीसींना माझा सांगना आहे तुमचं आरक्षण संपल आहे. तुम्ही झोपा काढा.

ओबीसीचा आरक्षण संपले आहे आणि शासन त्याला खत पाणी घालत आहे. राधाकृष्ण विखे पाटील सारख्या मुजोर मंत्र्याने ओबीसीचा आरक्षण संपवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी टीका देखील हाके यांनी केली आहे. त्यामुळे आता हाकेंच्या टीकेला सरकार आणि विखे पाटील काय प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com