Lok Sabha Election 2024 : शाहू महाराजांचे शक्तिप्रदर्शन, तर सत्यजित पाटील साध्या पद्धतीनं दाखल करणार उमेदवारी अर्ज

Kolhapur Lok Sabha Election 2024 : शाहू महाराजांचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.
Shahu Maharaj | Satyajit Patil Sarudkar
Shahu Maharaj | Satyajit Patil SarudkarSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. सोमवारी ( 15 एप्रिल ) कोल्हापूर ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

शिवाय हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नेते, माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनीदेखील अर्ज दाखल केला आहे, तर वंचितचे डी. सी. पाटील यांनी 12 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ), पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) आणि खासदार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ) यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज छत्रपती हे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची शक्तिप्रदर्शन रॅली दसरा चौक येथून निघणार आहे. दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर असेंबली रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येथे अर्ज दाखल करण्यास दाखल होणार आहेत.

या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील, युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार पी. एन पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे.

Shahu Maharaj | Satyajit Patil Sarudkar
Sanjay Mandalik News: महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची संपत्ती किती? इतक्या कोटींचे कर्ज

तर महाविकास आघाडीकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोणतीही शक्तिप्रदर्शन न करता केवळ निवडक 500 ते 1000 कार्यकर्त्यांना घेऊन ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सत्यजित पाटील सरुडकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

( Edited By : Akshay Sabale )

R

Shahu Maharaj | Satyajit Patil Sarudkar
Vishal Patil News : विशाल पाटलांच्या बंडखोरीनं ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली, संजयकाकांना फायदा होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com