Karad Political News : कराडचा लोणावळा होण्याची भिती..! महामार्गाचे काम बंद पाडण्याचा आनंदराव पाटील यांचा इशारा..

Flyover under Six-Layering of Pune-Bangalore Highway : कराड, मलकापुरवासियांकडून 10 जानेवारीचा अल्टीमेटम..
Anandrao Patil
Anandrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Karad Political News : पुणे-बंगळुरु महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत कराड ते नांदलापुर दरम्यान उड्डाणपुल उभारण्यात येत आहे. त्या पुलावरुन कोल्हापुर नाका ते कोयना पुल दरम्यान दोन्ही बाजुंनी कराड शहरात येण्यासाठी रस्ताच देण्यात आलेला नाही. त्यामुळे कराडचे महत्व कमी होवुन उद्योग-व्यवसायालाही फटका बसणार आहे.

त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या सहकार्याने सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून सर्वपक्षीय लढा उभारण्यात येईल. 10 जानेवारीपर्यत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा न काढल्यास जनआंदोलन उभारुन महामार्गाचे काम बंद पाडु असा इशारा माजी आमदार आनंदराव पाटील (Anandrao Patil) व सहकाऱ्यांनी दिला.

Anandrao Patil
Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेचे मोठे संकेत, म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द पूर्ण करण्याची वेळ..!'

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसेच कराड, मलकापूर परिसरातील नागरिक उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, कराड (Karad) हे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे ऐतिहासिक शहर आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी महामार्ग कराडमधून गेला तर दळणवळण सुधारुन शहराची प्रगती होईल, ही दूरदृष्टी ठेवली.

आज त्यांचे स्वप्न भंग करण्याचा डाव आखुन कराड शहराला लोणावळासारखे रूप देणेचे काम फ्लायओवर ब्रिजच्या नवीन आराखड्यामुळे होमार आहे. साताऱ्यातील हॉटेल फर्न येथे हायवे खाली उतरवून शहरातील लोकांना अप्रोच रस्ता देऊन पुन्हा पुणे-मुंबईकडे रस्त्याचा उड्डाणपूल केला आहे. त्याचप्रमाणे कराड व मलकापूर शहरांचे अस्तित्व अबाधित ठेवले पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2020-2021 साली महामार्ग विभागाचा कराड-मलकापुर फ्लायओवरचा प्लॅन वेगळा होता आणि आज दुसऱ्याच प्लॅनप्रमाणे काम सुरु आहे. नांदलापूर फाटा ते जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासा कमानी पुढे कोयना नदीच्या अलीकडे उतरणारा प्लॅन होता. परंतु हा प्लान नांदलापूर ते नदी पलीकडे वारुंजी-गोटे फाटा असा ओवरब्रिज केला आहे. त्यामुळे कराड व मलकापुर शहराचे महत्व कमी होणार आहे.

कराडचे लोणावळ्यासारखे चित्र होऊ नये म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहोत. खासदार भोसले यांना ही सर्व हकीकत सांगितली. त्यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी, कराड, मलकापुरचे लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवुन सुचना दिल्या आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीनिवास पाटील यांनाही निवेदन दिले आहे.

Anandrao Patil
Assembly Winter Session : देवयानी फरांदे यांचा अंधारेंविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव नार्वेकरांच्या कोर्टात

कराड शहराचे अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही लढा देणार आहोत. खासदार भोसले यांच्या सहकार्याने सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून सर्वपक्षीय लढा उभारण्यात येईल. 10 जानेवारीपर्यत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा न काढल्यास जनआंदोलन उभारुन महामार्गाचे काम बंद पाडु, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शिंदे-ठाकरे गट एकत्र..

शिवसेनेतील बंडाळीपासून ठाकरे आणि शिंदे गटात आमदार अपात्रतेसह पक्ष आणि चिन्हावरून न्यायालय, निवडणूक आयोगात कायदेशीर लढाई सुरू आहे. दोन्ही गट जाहीर कार्यक्रमात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. असे असताना कराडमधील उड्डाणपुलाच्या प्रश्नावर शिंदे-ठाकरे गट एकत्र आला आहे.

बाजारपेठ आणि नागरिकांच्या प्रश्नाला प्राधान्य

सध्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत कराड-नांदलापूर फाटा यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या मूळच्या आराखड्यात बदल करण्यात आल्यामुळे कराड आणि मलकापूर शहरातील बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार असून नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

(Edited by Amol Sutar)

Anandrao Patil
Maharashtra Health Department : अखेर राज्य सरकार भानावर आले, आरोग्य विभागातील कंत्राटी भरतीचा निर्णय मागे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com