Mohite Patil : शिंदेसेनेला माळशिरसचे सभापतिपद देण्यामागची खासदार मोहिते पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Malshiras Sabhapati Issue : माळशिरस पंचायत समितीत राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही मोहिते पाटील यांनी शिंदेसेनेला सभापतिपद दिल्याची चर्चा रंगली. त्यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया देत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
Malshiras Sabhapati Election
Malshiras Sabhapati ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 March : माळशिरस पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बहुमत असूनही मोहिते पाटील यांनी सभापतिपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिले आहे. त्याची चर्चा जिल्ह्यात जोरदारपणे सुरू आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यावर उत्तर देऊन चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

खासदार धैर्यशील माेहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले, माळशिरसमधील जनतेने दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कौल दिला होता. या युतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गटाला सभापतिपद आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उपसभापतिपद घेतले आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत.

आमचे आजोबा (स्व) शंकरराव मोहिते पाटील यांचे सहकारी नानासाहेब मगर यांना मागे एकदा उपसभापती (Deputy Sabhapati) करण्याची संधी आली होती. मात्र, दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून त्यांनी आपणहून स्वतः मागे राहून त्या कार्यकर्त्याला उपसभापती होण्याचा मान दिला होता, असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

नानासाहेब मगर यांच्याच घरातील एका मुलाला आता आम्ही सभापती केलेले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नानासाहेब मगर यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे, अशी भावना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलून दाखवली.

Malshiras Sabhapati Election
Mohite Patil VS BJP : मोहिते पाटलांची मोठी खेळी : दोन सदस्यांच्या शिंदेसेनेला सभापतिपद, पालकमंत्र्यांना शह देण्याचा डाव

ते म्हणाले, सभापती दत्तात्रेय मगर आणि उपसभापती मनिषा पाटील हे दोघंही नवीन आणि तरुण आहेत. आजपर्यंतच्या सभापती आणि उपसभातींनी माळशिरस तालुक्याचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. त्याचपद्धतीने कामकाज या दोघांकडून अपेक्षित आहे.

यावर्षी दुष्काळाची स्थिती राहील, असं सांगितलं जात आहे, त्यामुळे त्यांनी आतापासूनच सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाईच्या संदर्भात नियोजन करावं, अशी माझी त्यांना सूचना राहील.

Malshiras Sabhapati Election
Sunetra Pawar Satara Tour : सुनेत्रावहिनींचा पवारांच्या बड्या नेत्याला निरोप; साताऱ्यातील नव्या राजकीय घडामोडींचे संकेत

आमची युती ही निवडणुकीपूर्वीची आहे. नगरपालिका निवडणुकीपासून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांशी नेत्यांशी बोलून त्यांच्या परवानग्या घेऊनच शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र काम करत आहेत, तालुक्याचा विकास आपल्याला करायचा असून पक्षाच्या वरिष्ठांशी सल्लामसलत करूनच सगळ्या गोष्टी पुढे नेल्या जातील, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com