साताऱ्यात राष्ट्रवादीची नवी खेळी; शिवसेनेला मात देण्यासाठी पार्थ पवारांना देणार उमेदवारी

Satara| mahesh Shinde| NCP-Shivsena| Parth Pawar| महेश शिंदे यांना विचारले असता त्यांनी वेलकम टू कोरेगाव असे उत्तर दिले आहे.
mahesh Shinde-Parth Pawar
mahesh Shinde-Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

सातारा : कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात जी चर्चा सुरू आहे. त्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते शशिकांत शिंदे (shashikant Shinde) यांचा पराभव केल्यानंतर शिवसेना नेते महेश शिंदे यांनी कोरेगावात स्वतःची आणि शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोसायट्या ग्रामपंचायतीपासून अगदी लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये गावागावांमध्ये यावेळी शिवसेनेचा (Shivsena) कार्यकर्ता दिसू लागला आहे.

आता त्यांचे हे आव्हान मोडून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे कोरेगाव मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून येणारा विधानसभेसाठी उमेदवारीचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. याबाबत कोरेगावचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांना विचारले असता त्यांनी वेलकम टू कोरेगाव या केवळ एका वाक्यात राष्ट्रवादीच्या या खेळीला आव्हान दिलेले आहे.

mahesh Shinde-Parth Pawar
गुडीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे आज कोणता पिक्चर दाखवणार?

इतकेच नव्हे तर, कोरेगाव मधील महत्त्वाचा असणारा जरंडेश्वर कारखाना आता सभासदांच्या हातात आल्याचा धक्कादायक दावा देखील केला. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती व्यक्तीकडे असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. त्यानंतर स्वतः किरीट सोमय्या या कारखान्यावर येऊन पाहणी करून गेले होते. त्यानंतर आयकर विभागाने या कारखान्यावर धाड टाकली होती. कारखान्याची तपासणी देखील केली होती त्यामुळे आता महेश शिंदे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com