

Sangali Political News : जत तालुक्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्तक्षेपामुळे माजी आमदार विलासराव जगताप नाराज आहेत. गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या तालुक्यात कोण विचारत नाही, त्यांना इथं कोण विचारणार, असा टोला जगताप यांनी लागवला.
जतमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात जगताप म्हणाले, तम्मनगौडा रवीपाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पडळकर तालुक्यातील पदाधिकऱ्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटी घडवून आणत आहेत. निधी देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, पडळकरांना त्यांच्या गावात कोणी विचारत नाही. ते जतमध्ये लिंगायत व धनगर समाजाचे समीकरण जमवत आहेत. मात्र, कोणी बाहेरची व्यक्ती तालुक्यात लुडबूड करत असेल तर मी दंड थोपटून रिंगणात उभा असेन, " असा इशारा भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला.
"सर्व जिल्हा परिषद गटांत जाऊन नेते व कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊ. एकमत असेल तर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधानसभेचा उमेदवार ठरवू" असेही त्यांनी स्पष्ट केले. (Sangali News)
माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, सुनील पवार, आकाराम मासाळ, मोहन कुलकर्णी, रवींद्र सावंत, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद, चंद्रकांत गुडोडगी, लक्ष्मण बोराडे आदींसह भाजपचे जगताप समर्थक मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होते. (BJP Politics)
जगताप म्हणाले, "माझी वाटचाल संघर्षाची आहे. मी जनतेच्या जीवावरच निवडला गेलो. प्रत्येक पक्षात तालुक्याच्या प्रमुख पदावर राहिलो. योग्य निर्णय घेतले. मात्र, भाजपने तम्मनगौडा रवीपाटील यांना निवडणूक प्रचार प्रमुखपद देऊन चूक केली. ती सुधारण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. ते निर्णय घेतील, निर्णय घेत नसतील तर बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ."
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.