

Solapur, 05 November : मागच्या सरकारमध्ये आम्ही काम केलं आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोणालाच निधी मिळत नाही. राज्य सरकारवर वाढलेला आर्थिक भार आणि आलेल्या वेगवेगळ्या योजना यातून आमच्या प्रत्येकाच्या निधीला खात्री लागली आहे. राज्यातील 288 आमदारांच्या समोरचा हा प्रश्न आहे, अशा शब्दांत विकास निधीबाबत थेट राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कबुली दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याची तक्रार पक्षाच्या बैठकीत केली आहे. त्यावर बोलताना मंत्री आबिटकर यांनी निधीबाबतचे वास्तव मांडले. ते म्हणाले, पक्ष आणि भूमिका म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी मांडलेली भूमिका वेगळी असेल. पण आर्थिक बाबीत काही मर्यादा आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यातून काही तरी मार्ग काढतील. अनेक योजनांमुळे निधीला मर्यादा आल्या आहेत. मात्र, आता एकूण कामकाज सुरळीत सुरू आहे आणि राज्याचे कामकाज प्रगतीपथावर जाईल.
जनआरोग्य संवाद यात्रेबाबत आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणा सक्षम करणे आणि खासगी डॉक्टरांना प्रोत्साहन देऊन त्यांचे काम गतिमान करणे, हा जनआरोग्य संवाद यात्रेचा हेतू आहे. शासकीय यंत्रणा आणि खासगी डॉक्टर या दोघांमध्ये समन्वय घडवून डॉक्टरांच्या अडीअडचणी, महात्मा फुले आरोग्य योजनेत सहभागी करणे. त्यांना सोबत घेऊन लोकांना दर्जेदार आणि माफक दरात आरोग्य सेवा देण्याचा जनआरोग्य संवाद यात्रेतून प्रयत्न करत आहे.
राज्यातील डायलेसीस सेंटरबाबत त्या कंपनीचे केंद्रातील दायित्व वाढले आहे. केंद्राकडे निधीची मागणी केली आहे, तो लवकरच उपलब्ध होईल. निधी उपलब्ध झाला नसला तरी सेवा कुठेही बंद पडू नये, अशी सूचना कंपनीला देण्यात आलेल्या आहेत. सगळीकडे डायलेसिस सेवा सुरु आहे, महालॅबच्या बिलाबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरु आहे, असेही आबिटकर यांनी नमूद केले.
राजू शेट्टींच्या आंदोलनावर आज मार्ग निघेल
राजू शेट्टी यांनी ऊसदराबाबत आंदोलन सुरू केले आहे आणि कारखानदारही एका विशिष्ट रकमेच्या पुढे जात नाही. राज्य सरकारकडून दोघांशीही चर्चा सुरू आहे. शेतकरी संघटनेकडून 4000 उचल मागितली जाते. मात्र, कारखानदार त्याला तयार नाहीत. संघटना आणि कारखानदारांशी आम्ही बोलतोय. त्यातून आज मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.