अख्खी राष्ट्रवादी विरोधात तरीही उपसरपंचांनी 'अविश्वास' ठराव हाणून पाडला : पुण्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत 'राजकीय थरार'

गुप्त मतदानात दोन मते फुटल्याने पारगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच नितीन ढोबळे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव एका मताने फेटाळला गेला.
Deputy Sarpanch Nitin Dhoble survives no-confidence motion in Paragaon Gram Panchayat by a narrow margin, highlighting intense local political drama.
Deputy Sarpanch Nitin Dhoble survives no-confidence motion in Paragaon Gram Panchayat by a narrow margin, highlighting intense local political drama.
Published on
Updated on

Pargaon Grampanchayat : राज्याच्या सत्तानाट्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीत सत्तानाट्य घडले आहे. सरपंचपद रिक्त असताना गावचा कारभार उपसरपंच बघत होते. याच उपसरपंचांना हटवण्याची योजना त्यांच्याच पक्षातील सदस्यांनी आखली. त्यानुसार अविश्वास ठरावही दाखल करण्यात आला. पण उपसरपंचांनी ऐनवेळी सूत्र फिरवून अवघ्या एका मताने हा अविश्वास ठराव हाणून पाडला. त्यामुळे त्यांचे उपसरपंचपद कायम राहिले आहे.

तालुक्याच्या पूर्वभागातील मध्यवर्ती व महत्वाची बाजारपेठ असलेल्या पारगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नोव्हेंबर 2023 मध्ये पार पडली. या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी अपक्ष श्वेता किरण ढोबळे निवडून आल्या होत्या. तर सदस्यपदाच्या 15 जागांपैकी राष्ट्रवादीचे 11, शिवसेनेचे 3 व 1 अपक्ष सदस्य निवडून आले होते. त्यावेळी उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या नितीन ढोबळे यांची बिनविरोध निवड झाली होती.

नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत सरपंच श्वेता ढोबळे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पारगाव पंचायत समिती गणातून निवडून आल्या. त्यामुळे त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला असून सध्या सरपंचपद रिक्त आहे. सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंच ढोबळे गावचा कारभार चालवत होते. पण मनमानी कारभार आरोप करत ढोबळे यांना पदावरून दूर करण्यासाठी 12 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला.

Deputy Sarpanch Nitin Dhoble survives no-confidence motion in Paragaon Gram Panchayat by a narrow margin, highlighting intense local political drama.
Pune ZP News: कोणाच्या हाती जाणार महत्वाच्या समित्या? पुणे जिल्हा परिषदेत ‘पॉवर गेम’ सुरू

बाळासाहेब ढोबळे, काळूराम लोखंडे, वीरेंद्र ढोबळे, लता ढोबळे, प्रियांका ढोबळे, रोहिणी देवडे, विठ्ठल ढोबळे, अंकिता लोखंडे, गौरी ढोबळे, गीतांजली लोंढे, रेखा लबडे, दत्ताराम वैद या 12 सदस्यांनी 7 एप्रिल रोजी तहसीलदारांना पत्र पाठले. उपसरपंच नितीन ढोबळे हे मनमानी कारभार करत असून ग्रामपंचायतीच्या बैठका वेळेवर घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडू इच्छितो, त्याकरिता अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली.

त्यानुसार नायब तहसीलदार शांता असवले यांच्या उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांची सभा संपन्न झाली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी के. डी. भोजणे उपस्थित होते. अविश्वास ठरावासाठी गुप्त मतदान झाले. पण ठरावाच्या बाजूने 10 मते पडली तर ठरावाच्या विरोधात 5 मते पडली. ठराव मंजूर करण्यासाठी नियमानुसार एकूण सदस्यांच्या तीन चतुर्थांश सदस्यांची आवश्यकता असते. म्हणजे 11 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक होते.

Deputy Sarpanch Nitin Dhoble survives no-confidence motion in Paragaon Gram Panchayat by a narrow margin, highlighting intense local political drama.
Pune Crime : पुण्यातही अशोक खरातची पुनारावृत्ती; भोंदूकडून महिलेवर अत्याचार; ‘माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार...‘

प्रत्यक्षात ढोबळे यांना १० मते पडली. त्यामुळे त्यांच्या विरुध्दचा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. आता संपूर्ण गावात अविश्वास ठराव दाखल करताना पत्रावर 12 सदस्यांच्या सह्या होत्या. परंतु गुप्त मतदान पद्धतीत ठरावाच्या बाजूने 10 मते पडली. त्यामुळे 2 मते कोणती फुटली याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com