Sugarcane FRP : पहिला हप्ता 3500 रुपये द्या; शेतकऱ्यांच्या मागणीवर कलेक्टरांनी एक तासाची वेळ मागितली...

Raju Shetti News : राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात ऊसदरासाठी हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रतिटन 3500 रुपयांचा पहिला हप्ता मागितला असून जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही.
Solapur Collector Office
Solapur Collector Officesarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 16 November : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊसदरासंदर्भात आंदोलन करण्यात येत आहे. हजारो शेतकऱ्यांसह माजी खासदार शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. दुसरीकडे, ऊस उत्पादक शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये ऊसदरासंदर्भात बैठक झाली, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी ३५०० रुपयांचा पहिला हप्ता मागितला असून जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करण्यासाठी एक तासाचा वेळ मागितला आहे, त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापुरात ऊस दरावरून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची सुरुवात हुतात्मा चौकापासून झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

मागील 1 तासापासून सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची बैठक सुरु होती. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत; तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Solapur Collector Office
Raju Shetti : सोलापूरचे कारखानदार शेतकऱ्यांना 900-1200 दर कमी देतात; हा अन्याय का.? : राजू शेट्टी कडाडले

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आम्हाला पहिली उचल 3500 रुपये मिळावी, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 1 तासाचा वेळ मागून घेतला आहे. ऊस कारखानदारांशी चर्चा करून पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Solapur Collector Office
Karad Politic's : कराडला लागणार सातारा Dcc बॅंकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी? : आमदार भोसले अन्‌ उंडाळकरांची नावे चर्चेत

दरम्यान, सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऊस उत्पादक शेतकरी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत ऊसदराबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. आता तासाभरानंतर जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.