Raju Shetti News : 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींची थेट अमित शाहांकडेच तक्रार; काय आहे नेमके कारण ?

Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहित व्यापारी आणि साखर कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Raju Shetti, Amit Shah
Raju Shetti, Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : यंदाच्या गळीत हंगामाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 3700 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनाने विरोधात आंदोलन पुकारले आहे. मात्र, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहित व्यापारी आणि साखर कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे दर प्रतिक्विंटल 3100 रुपयापर्यंत खाली आले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. सध्या बाजारात साखरेचा दर हा प्रतिक्विंटल 4 हजार रुपयापर्यंत आहे. यामुळे केंद्र सरकारच्या सहकार विभाग व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने तातडीने चौकशी करून संबधित साखर कारखाने व व्यापारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे.

Raju Shetti, Amit Shah
Maharashtra Congress : काँग्रेसमध्ये वाद उफाळला, विधानसभा पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांचीच; वडेट्टीवारांनी डागली तोफ

महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखान्यांचा साखर विक्रीचा दर 3100 रुपयापर्यंत खाली आलेला आहे. सध्या बाजारात व्यापारी प्रतिकिलो 37 रुपयांनी दुकानदारांना साखरेची विक्री करत असून दुकानदाराकडून ग्राहकांना प्रतिकिलो 40 रुपयांनी साखर विकली जात आहे.

Raju Shetti, Amit Shah
Nana Patole: मोठी बातमी! विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का? पटोलेंचं थेट खर्गेंना पत्र

कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील काही खासगी व सहकारी साखर कारखानदारांचे नातेवाईकच साखरेचे व्यापारी आहेत. साखर कारखान्यांकडून कमी दराने विकलेली साखर बाजारात येत नसून ती साखर संबधित साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच ठेवण्यात येत आहे.विशेष करून मराठवाडा, विदर्भ व कर्नाटकमधील ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी आहे व आर्थिक अडचणीत आहेत असे कारखाने कमी दराने साखर विक्री करू लागले आहेत.

Raju Shetti, Amit Shah
Uddhav Thackeray Video : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा फोन, नेमंक कारण काय?

गेल्या महिन्याभरामध्ये ज्या साखर कारखान्यांनी साखर विक्री केली आहे, ती किती दराने विकली व ज्या व्यापाऱ्यांनी ती साखर खरेदी केली आहे. ती साखर कोणत्या बाजारात किती दराने विक्री केली आहे, याची सखोल चौकशी केल्यास यामधील बिंग फुटणार आहे.

काही साखर कारखानदार व साखरेची मोठे व्यापारी मिळून शेतकरी व ग्राहकांना लुबाडत असून या साखर विक्रीची सखोल चौकशी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti, Amit Shah
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनी आपल्या पहिल्याच भाषणाने संसद गाजवली! संविधानापासून अदानीपर्यंत सगळेच काढले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com