Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge : पालकमंत्री मुश्रीफांचे 'षटकार', तर घाटगेंचं 'कॅच'; कागलमध्ये सुरू झालाय 'रिल्स वॉर'

Reels war between Hasan Mushrif and Samarjit Singh Ghatge activists : कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे समरजीत सिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर रिल्स वॉर रंगले आहे. विधानसभा निवडणुकीची यातून दोन्ही बाजूने चाचपणी केली जात आहे.
Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge
Hasan Mushrif Vs Samarjit Singh GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : पालकमंत्री हसन मुश्रीफ गेले पाच टर्म कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यंदाही ते आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. नुकतेच तुळजापूर येथे जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा आमदार होण्यासाठी साकडे घातले आहे. तर दुसरीकडे त्यांचेच विरोधक असलेले भाजपचे नेते समरजीत सिंह घाटगे हे मुश्रीफ यांचाच पराभव करत विधानसभा गाठणार, असा विडा उचलला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ आणि घाटगे यांचा राजकीय संघर्ष उफाळतो आहे. तर यंदा देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाटगे आणि मुश्रीफ (Hasan Mushrif) गटाचा संघर्ष महायुतीत असूनही उसळणार आहे, यात शंका नाही. याचे कारण म्हणजे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या घाटगे आणि मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये 'रिल्स वॉर' सुरू आहे.

Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge
Yogesh Tilekar: विधानसभेत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवा; योगेश टिळेकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे (BJP) नेते सरमजीत सिंह घाटगे दोघेही सध्या महायुतीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील दोघेही कट्टर राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे दोघांनीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघांनीही प्रचार दौऱ्याला सुरवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीत याच मतदारसंघातून पहिली ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यातच सर्व राजकीय घडामोडी गृहीत धरून विधानसभेची चाल सुरू ठेवली आहे. अशातच कार्यकर्त्यांनीही कागल विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलं ढवळून काढला आहे.

Hasan Mushrif Vs Samarjit Singh Ghatge
Congress Toll Agitation : ‘खर्डा-भाकरी घेऊन आलोय, टोल बंद केल्याशिवाय मागे हटणार नाही’; खराब रस्त्यावरून काँग्रेस आक्रमक

पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर सोशल मीडियातून निशाणा साधला आहे. सध्या या दोन्ही गटात 'रिल्स वॉर' सुरू असल्याचे पाहायला मिळते. गेल्या पाच टर्म असणारे आमदार मुश्रीफ सहाव्यांदा आमदार होण्यासाठी कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेत आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी 'यंदा मुश्रीफसाहेबांचा सिक्स, आमदार फिक्स' हे रील टाकत रिल्सवर प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. तर त्यासोबतच भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यातील युवराज सिंगने मारलेल्या 'सहा बॉलच्या सहा सिक्स'वर रील तयार करण्यात आला आहे. त्याला मुश्रीफ यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

घाटगे गटाकडून ही याला चांगलाच प्रत्युत्तर देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या टी-ट्वेंटी अंतिम सामन्यातील डेव्हिड मिलर याचा सूर्यकुमारने घेतलेल्या कॅचवर घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी रील करून अप्रत्यक्षपणे मुश्रीफ यांच्या वारूला रोखण्याचा ऍक्शन प्लॅन सुरू झाल्याचे दाखवून दिले. मी टप्प्यात आणूनच कार्यक्रम करतो, कुठला सिक्स आणि कुठला फिक्स, असे प्रत्युतर देत कार्यकर्त्यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे या दोन्ही रिल्सची सध्या कागल विधानसभा मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com