Kolhapur NCP News: शरद पवारांना मोठा धक्का; मुश्रीफांविरोधात निवडणूक लढलेला नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला

NCP Samarjeetsinh Ghatge : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समरजीत घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सुरुवातीला वरिष्ठांनी दिलेला नकार आणि त्यानंतर झालेल्या चर्चेअंती घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात होता.
Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: भाजपला रामराम ठोकत विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महायुतीविरोधात लढलेल्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या घरवापसीच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. पण त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळत नसल्याचं समोर आलं होतं. मात्र,आता समरजीत घाटगे यांचा भाजपप्रवेशाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत समरजीत घाटगे हे येत्या 8 एप्रिल रोजी मुंबईत भाजपमध्ये घरवापसी करणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समोर येत आहे. घाटगे यांनी थेट महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. आता मुश्रीफ - घाटगे दोघेही एकत्र असल्यानं त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

समरजीत घाटगे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. परंतू, ते यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहत पक्ष कार्यात सक्रिय झाल्याचं दिसून आलं होतं.

राजकारणात गुरु मानलेले राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद घेऊन समरजीत घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. दरम्यान, ते भाजपच्या विविध बैठकांना उपस्थिती लावली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचंही पाहायला मिळालं होतं.

Sharad Pawar-Hasan Mushrif - Samarjeet Shinh Ghatge
NCP Leader Crime: 'मी 5 वर्ष नगरसेवक, तुझं घरच पाडतो...'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकानं नागरिकाला धमकावलं, गुन्हा दाखल

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समरजीत घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सुरुवातीला वरिष्ठांनी दिलेला नकार आणि त्यानंतर झालेल्या चर्चेअंती घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात होता. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात दिवस निश्चित करत असताना सुरुवातीला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आडव्या आल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com