Satara : समीर शेख एसपी झाले अन्‌ अमृतवाडीत आनंदोत्सव...

पुणे ग्रामीण Pune Rural, नगर Nagar अशा जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा बजावत त्यांनी गुन्हे crime उघडकीस आणून आपल्या कार्याचा ठसा Work footprint त्यांनी उमटवला आहे.
SP Samir Shaikh
SP Samir Shaikhsarkarnama

भुईंज : उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांची एसपी म्हणून पदोन्नतीने पोलिस महासंचालक कार्यालयात नियुक्ती झाली आणि वाई तालुक्यातील अमृतवाडीत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. लवकरच त्यांचा जाहीर सत्कार व कौतुक सोहळा होणार आहे. समीर शेख हे अमृतवाडीचे सुपूत्र आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच पदोन्नतीने पोलिस अधीक्षक पदावर गृह विभागाने नियुक्त केले. यामध्ये अमृतवाडी (ता. वाई) या गावाचे सुपूत्र समीर नजीर शेख यांना पोलिस महासंचालक कार्यालयात पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ते उत्तीर्ण होऊन उपविभागीय पोलिस अधिकारी झाले होते. पुणे ग्रामीण, नगर अशा जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा बजावत त्यांनी गुन्हे उघडकीस आणून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला आहे. दरम्यान समीर शेख यांना मिळालेल्या संधीने वाई तालुक्यातील अमृतवाडी, पांचवड, भुईंज या गावांसह वाई तालुक्यातील मित्रपरिवार व ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

SP Samir Shaikh
Satara : SP समीर शेख यांची अवैध धंद्यांच्या उच्चाटनाची मोहिम...

लवकरच पोलीस अधिक्षक समीर शेख यांचा जाहीर सत्कार व कौतुक सोहळा अमृतवाडी ग्रामस्थ, कैलास उद्योग समूहाचे मार्गदर्शक दत्ताशेठ बांदल मित्र परिवार, भुईंज प्रेस क्लबचे संयुक्त सहभागाने होणार असल्याची माहिती पैलवान जयवंत पवार, जयवंत पिसाळ, राहुल तांबोळी, यांनी दिली

SP Samir Shaikh
Satara : शिवाजी महाराजांचे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करा... शिवेंद्रसिंहराजे

एकाच नावाचे दोन अधिकारी

साताऱ्याचे नवीन एसपी समीर शेख व अमृतवाडीचे नव्याने झालेले एसपी समीर शेख असे एकाच नावाचे दोन अधिकारी राज्याच्या पोलिस दलात आहेत. याचा महत्वाचा दुवा सातारा जिल्हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न भुईंज प्रेस क्लबच्या वतीने होणार आहे.

SP Samir Shaikh
IPS अंकित गोयल, समीर शेख यांना केंद्राचे विशेष पदक जाहीर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com