Sangli Bank Election : "भाजपच्या विरोधात उभे राहाल तर राजीनामा..."; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून चंद्रकांत पाटीलांची पदाधिकाऱ्यांना तंबी

Chandrakant Patil Warning : "मी सहकारमंत्री असताना काही कायदे बदलण्याचे काम केले. यादरम्यान रिझर्व्ह बँकेला मी निवेदन दिले होते. सहकारी बँकेतील सदस्यांना दहा वर्षांनंतर एक टर्म तरी गॅप टाकायला लावा, असे म्हटले होते. तसा नियम वर्षभरापूर्वी रिझर्व्ह बँकेने केला. त्याच्या विरोधात न्यायालयात काहीजण गेले."
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News, 28 Sep : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज भरावेत. मात्र, पक्षाने आदेश दिल्यानंतर मागे घ्यावेत, ज्यांना तिकडून उभारायचे आहे त्यांनी इकडच्या पद, सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्याचे समजते. शिवाय भाजप आणि महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला समोर जातील असेही पाटील यांनी जाहीर केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक खरे क्लब हाऊस येथे पार पडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, नीता केळकर, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व २१ जागांसाठी अर्ज भरायचे आहेत.

जे इच्छुक आहेत त्या सर्वांनी अर्ज भरावेत. मात्र, उमेदवार निश्चित झाल्यानंतर ज्यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल त्यांना मागे घ्यावे लागतील, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. काहीजण विरोधकांशी साटेलोटे करण्याची शक्यता लक्षात घेऊन, "ज्यांना तिकडून उभारायचे आहे, त्यांनी भाजपच्या पद, सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा," असाही त्यांनी इशारा दिला आहे.

Chandrakant Patil
Gokul Election : गोकुळच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना सुनावलं; म्हणाले, "कोरे आणि तुम्हीच ठरवा..."

निवडणुकीत पॅनलसोबत असल्याचे दाखवायचे आणि विरोधकांचे काम करायचे, असा प्रकार होतो, तो बंद झाला पाहिजे. ही बैठक यापूर्वीच व्हायला हवी होती. तयारीला वेळ मिळाला असता, असे मत काहींनी मांडले. दहा वर्षे कार्यकालाचे रिझर्व्ह बँकेस निवेदन वर्षानुवर्षे आपल्याच घरात सत्ता राहील, असे कायदे सहकारात होते.

Chandrakant Patil
Gokul Politics : महायुतीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ; चर्चा फिस्कटली, आता मुख्यमंत्रीच घेणार जागावाटपाचा अंतिम निर्णय, असा ठरला फॉर्म्युला...

"मी सहकारमंत्री असताना काही कायदे बदलण्याचे काम केले. यादरम्यान रिझर्व्ह बँकेला मी निवेदन दिले होते. सहकारी बँकेतील सदस्यांना दहा वर्षांनंतर एक टर्म तरी गॅप टाकायला लावा, असे म्हटले होते. तसा नियम वर्षभरापूर्वी रिझर्व्ह बँकेने केला. त्याच्या विरोधात न्यायालयात काहीजण गेले. त्याचा फायदा घेऊन काहीजण जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले, पण त्यांच्या निवडणुका रद्द होणार," असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com