Sangli Bank Election : सांगली बँकेच्या 15 जागा बिनविरोध पण पडळकरांना लढावंच लागणार : सदाभाऊ खोत संतापले, म्हणाले, "जिल्ह्यातील सग्या-सोयऱ्यांनी..."

Sadabhau Khot on Sangli Bank Election : "सहकारातील काही मोजक्या लोकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आमचा वाघ आज एकटाच मैदानात लढतोय. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे. या जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून आमचा ढाण्यावाघ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाईल, यात अजिबात शंका नाही."
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News, 22 Oct : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १५ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून, सहा जागांसाठी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वपक्षीय पॅनेलमधील १९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, या निवडणुकीतील बिनविरोध निवडीवरून राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी बिनविरोध निवडीवर आक्षेप घेत निशाणा साधला आहे. सुकाळ्यातील जागा बिनविरोध केल्या आणि दुष्काळी भागातील जागांसाठी निवडणूक लावली, असा टोला त्यांनी लगावला. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुमनताई पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांना संचालक होण्यासाठी निवडणूक लढवावी लागणार आहे.

तर बिनविरोध निवड झालेल्या १५ संचालकांमध्ये आमदार डॉ. विश्वजित कदम, अमोल बाबर, महेंद्र लाड, देवराज पाटील, विराज नाईक, तानाजी पाटील, राहुल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक, वैभव शिंदे, पूजा पाटील, वर्षा सावंत, नितीन होनराव आणि अपर्णा देशमुख यांचा समावेश आहे.

Sadabhau Khot
Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या 21 पैकी 12 जागा बिनविरोध; 9 जागांसाठी निवडणूक; दिग्गजांच्या माघारीनंतर कोण बिनविरोध? कोण रिंगणात?

या बिनविरोध निवडीवरून सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. "विना सहकार नही उद्धार" अशा घोषणा देत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध केली. सुकाळ्यातील जागा बिनविरोध आणि दुष्काळातील जागांवर मात्र निवडणूक लावली. जिल्ह्यातील सग्या-सोयऱ्यांनी लोण्याचा गोळा वाटून खाल्ला आणि दुष्काळी भागातील निवडणूक मात्र लावली, अशी टीका खोत यांनी केली.

Sadabhau Khot
Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हायव्होल्टेज लढत : संजयकाका पाटलांच्यापुढं सुमनताईंचं आव्हान; आमदार रोहित पाटलांची प्रतिष्ठापणाला

पुढे बोलताना त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची पाठराखण केली. "सहकारातील काही मोजक्या लोकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आमचा वाघ आज एकटाच मैदानात लढतोय. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे. या जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून आमचा ढाण्यावाघ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाईल, यात अजिबात शंका नाही," असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com