Sangli ZP : सांगलीत भाजप-शिवसेनेला पुन्हा दणका; सुहास बाबरांच्या गटात फूट, सभापती बिनविरोध! विशाल पाटलांचे भाकीत ठरले खरे!

Sangli ZP Suhas Babar Vishal Patil : सांगील जिल्हा परिषदेतील सभापती पदासाठी आज निवणूक होणार होती. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत मविआतील पक्षांनी पुन्हा ताकद दाखवून दिली.
Sangli ZP
Sangli ZPSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. आमदार सुहास बाबर यांना शिवसेनेत पडलेली फुट रोखण्यात अपयश आले आहे. शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर खासदार विशाल पाटील यांनी सभापती निवडीत आणखीन सदस्यांची वाढ होणार, असे भाकीत केले होते.

हे भाकीत खरे ठरले असून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत गैरहजर राहिलेले शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गैरहजर राहणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांना सभापती पदाचे बक्षीस मिळाले आहे.

महाविकास आघाडीकडून सांगली जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, महिला बालकल्याण स्नेहल मोरे, समाज कल्याण सभापती दादासाहेब कोळेकर शिक्षण सभापती सावित्री पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे भाजपकडे आता 24 चे संख्याबळ तर महाविकास आघाडीकडे 37 चे संख्याबळ झाले आहे. भाजपकडून कोण उमेदवार येणार याची उत्सुकता होती. मात्र महायुतीकडून सभापती पदासाठी अर्जच भरण्यात न आल्याने सभापती निवडी बिनविरोध झाली.

यापूर्वी पृथ्वीराज पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत उपाध्यक्ष निवडीत स्वतः आणि जयदीप भोसले हे गैरहजर राहिले होते. शेवटच्या क्षणी आमदार सुहास बाबर हे भाजपमध्ये गेल्यानंतर सभापती निवडीमध्ये शिवसेना भाजपसोबत राहील असे संकेत होते. शिवाय मध्यंतरीच्या काळात पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतील असं शक्यता होती. मात्र आमदार सुहास बाबर हे शिवसेनेतील फूट रोखण्यात अपयशी ठरले आहेत.

Sangli ZP
Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा गेम होणार? विलासराव जगतापांनी वात पेटवली; अजितराव घोरपडेंनी केला धमाका

गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर

दरम्यान काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी पृथ्वीराज पाटील यांचा कुणबी दाखला बोगस असल्याचा आरोप मुंबईत पत्रकार परिषदेतून केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून तानाजी पाटील यांनी, अमरसिंह देशमुख, सचिन मोटे व आता आमच्याविरुद्ध तक्रारी असे राजकारण करू नका, तुमचे जातीचे राजकारण जनतेने नाकारले असा टोला गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.

Sangli ZP
Rupali Chakankar News: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर फार्महाऊसवर 'मुळशी पॅटर्न' जंगी पार्टी ? एका 'स्टेटस'मुळे फुटलं बिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com