

सातारा जिल्हा परिषद निवडीत झालेल्या गोंधळामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
सुप्रिया सुळे यांनी या घटनेला लोकशाहीची हत्या म्हणत सरकारवर टीका केली.
पोलिस कारवाई आणि ‘अदृश्य शक्ती’च्या दाव्यामुळे प्रकरण अधिकच तापले आहे.
Pune News : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान झालेला राड्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. तर नवनिर्वाचित सदस्यांसह पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना झालेली धक्काबुक्की, पोलिसांनी दिलेली वागणूक चर्चेची ठरली. याच मुद्द्यावरून विधीमंडळासह राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत भाजपला टार्गेट केलं आहे. तर महायुती सरकारलाही झापलं आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत साताऱ्यात जे काही घडले ती लोकशाहीची हत्या असल्याचे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर प्रकरणामागे अदृश्य शक्ती असून त्याच शक्तीच्या इशाऱ्यावर पोलिसांनी हे कृत्य केल्याचा खळबळजनक दावा देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. तसेच पोलिसांनी त्यांना दहा-दहा जणांनी धरल्याची धक्कादायक माहिती विधीमंडळात दिली होती. तर या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले होते.
यावरून थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर देखील आंदोलन झाले. दरम्यान या प्रकरणाचा विरोधाकांनी जोरदार निषेध करत शिंदेंच्या शिवसेनेचे ते वाघ गेले कुठे म्हणत भाजपला थेट सुनावले होते. तर सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, शंभुराज देसाई काल विधीमंडळात जे बोलले ते धक्कादायक होते. एका कॅबिनेट मंत्र्याला मारहाण कशी होते? या घटनेचा निषेधच आहे. हे सगळं प्रकरण एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक असून याच्या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कोणाच्याही मनमर्जीने चालणार नाही.
हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार. हा पोलिसांचा संबंध नाही. त्याठिकाणी पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती त्या अदृश्य शक्तीची ताकद आहे. जे पोलिसांना करायला लावले. नाही तर महाराष्ट्रातील पोलिस असे करणारच नाहीत, असाही दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
या प्रकरणावरून आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून साताऱ्यात जे काही झालं ती लोकशाहीची हत्या आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहित नाही. मात्र हा विषय मोठा भाऊ आणि छोट्या भावाचा नाही, तर लोकशाहीचा आहे. लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर ताकदीने लढण्याची गरज आहे. आता साताऱ्यात झाली उद्या दहा ठिकाणी होईल, असेही म्हणत त्यांनी आपण शंभू राजेंना फोन करणार असल्याचे म्हटलं आहे.
त्यांनी, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घ्यायची आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मार खात आहेत. कसला मार खाता असाही खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. तर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे दोघेही कॅबिनेट मंत्री असून ते सरकारचे भाग आहेत. ज्या सरकारचा हे भाग आहेत. त्यांनाच धक्काबुक्की होते. त्यामुळे याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तर हे पांडुरंगा काय दिवस बघायला लागतायत महाराष्ट्रात. धाकट्या भावालाच अशी धक्काबुक्की होत असेल तर आपल्याला सर्वांनाच आत्मचिंतन करावे लागणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
1. सातारा ZP प्रकरण काय आहे?
निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळ आणि धक्काबुक्कीमुळे वाद निर्माण झाला.
2. सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्या म्हणाल्या की ही लोकशाहीची हत्या आहे.
3. पोलिसांवर काय आरोप आहेत?
पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
4. ‘अदृश्य शक्ती’चा दावा काय आहे?
या प्रकरणामागे काही अदृश्य शक्ती असल्याचा दावा सुळे यांनी केला.
5. पुढे काय होऊ शकते?
या प्रकरणावरून राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.