Satara ZP Election : बलाढ्य भाजपविरोधात 22 वर्षाची मुलगी तडफेने लढली : CM फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याच्या बायकोला पराभवाचा धक्का

Satara ZP Election : साताऱ्यातील मंद्रुळकोळे गटातून २२ वर्षीय मृणाल पाटील यांनी भाजपच्या प्राची पाटील यांचा पराभव करत इतिहास घडवला आहे. त्या या निवडणुकीत राज्यातील सर्वात कमी वयाच्या विजयी महिला उमेदवार ठरल्या आहेत.
The youngest face of Satara Zilla Parishad, 22-year-old Mrunal Patil of Shiv Sena, celebrating her historic win in the Mandrulakole group against BJP’s heavyweight candidate.
The youngest face of Satara Zilla Parishad, 22-year-old Mrunal Patil of Shiv Sena, celebrating her historic win in the Mandrulakole group against BJP’s heavyweight candidate.Sarkarnama
Published on
Updated on

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत वयाच्या केवळ २२ व्या वर्षी मृणाल पाटील यांनी शिवसेनेकडून विजय मिळवला आहे. पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गटातून भाजपच्या तगड्या उमेदवार प्राची नरेंद्र पाटील यांना त्यांनी पराभवाचा धक्का दिला. त्या जिल्हा परिषदेत जिंकून गेलेल्या सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवार ठरल्या. गावच्या लेकीच्या या यशाने बनपुरीकरांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नाईकबाच्या पुण्यभूमीत वसलेले बनपुरी हे मृणाल पाटील यांचे मूळगाव आहे. सुप्रसिद्ध उद्योजक महेश पाटील यांची मृणाल ही ज्येष्ठ कन्या आहे. ११ मार्च २००३ ला जन्मलेल्या मृणालचे दहावीपर्यंतचे शिक्षण कऱ्हाडच्या लाहोटी कन्या प्रशालेत झाले.

कऱ्हाडच्याच सद्‍गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे टाटा कन्सलटनसी सर्व्हिसेसमध्ये त्यांची निवड झाली होती. यूएस आधारित प्रोजेक्टवर यशस्वी कार्याचा त्यांना अनुभव असून, त्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केले आहे.

जिल्हा परिषदेची नुकतीच झालेली निवडणूक त्यांनी शिवसेनेतून मंद्रुळकोळे गटातून लढवली व जिंकलीही. भाजपच्या प्राची पाटील यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान समोर असताना मृणाल यांनी कडवी झुंज दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची स्वतःची यंत्रणाही इथे कार्यरत होती.

The youngest face of Satara Zilla Parishad, 22-year-old Mrunal Patil of Shiv Sena, celebrating her historic win in the Mandrulakole group against BJP’s heavyweight candidate.
Satara Politic's : गोरे, नाईक, वाघ, पाटणकरांना शंभूराज देसाई एकटे पुरून उरले; पाटणमध्ये केवळ ‘शंभूराज’च!

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून झालेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणि निवडणूक काळात मंत्र्यांनी मतदारसंघावर बारकाईने ठेवलेले लक्ष या त्यांच्या विजयातील जमेच्या बाजू ठरल्या. शिवाय वडील सुप्रसिद्ध उद्योजक महेश पाटील हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात देत असलेले महत्त्वपूर्ण योगदान व त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरील लोकसंपर्क त्यांच्या पाठीशी राहिला.

मृणाल यांचे चुलते मनोज पाटील बनपुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. आजोबा (कै.) रघुनाथ पाटील यांनी बनपुरी सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले होते. तसा फार मोठा राजकीय वारसा पाठीशी नसतानाही मृणालने अवघ्या २२ व्या वर्षी निवडणूक जिंकत जिल्हा परिषदेत प्रवेश केल्याने गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

The youngest face of Satara Zilla Parishad, 22-year-old Mrunal Patil of Shiv Sena, celebrating her historic win in the Mandrulakole group against BJP’s heavyweight candidate.
Satara ZP : साताऱ्यात भाजपचं गर्वहरण! सत्तेसाठी शिवेंद्रराजे, जयकुमार गोरेंना शंभूराज देसाईंच्या बंगल्याच्या पायऱ्या चढाव्याच लागणार!

मंत्र्यांची भावनिक साद :

‘मी आता महेश पाटलांची आणि फक्त बनपुरीचीच लेक राहिली नाही, तर या विभागाची लेक म्हणून तुमच्या समोर आले आहे, मला मतदान करून सेवेची संधी द्या, कारण लेकीलाच काळजी असते, ’ असे भावनिक आवाहन मृणाल यांनी प्रचारादरम्यान केले होते. मंत्री देसाई यांनीही एकवेळ मला विधानसभेला मतदान करू नका; परंतु गट-तट विसरून तुमच्या लेकीच्या पाठीशी राहा, असे म्हणत बनपुरीकरांना भावनिक साद घातली, त्याचाही परिणाम मतदानावर झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com