Teacher News : शिक्षक मान्यतेसाठी मुदतवाढ, पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना दिलासा

SPPU Teacher Deadline Extended : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षक मान्यतेसाठी मुदतवाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे जाहिरातीसाठी १५ ऑक्टोबर तर शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव सादर ३० ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.
Pune University
Pune Universitysarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune University News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्थानिक निवड समितीमार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या अध्यापकांच्या शिक्षक मान्यतेच्या प्रस्तावांसाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. अध्यापक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत, तर शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांना प्रस्ताव सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यापूर्वी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात स्थानिक निवड समितीमार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या अध्यापकांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे पुढील १० दिवसांत विद्यापीठाकडे जमा करण्यास सांगितले होते. स्थानिक निवड समितीचे आयोजन केल्यानंतर त्याचा अहवाल ४८ तासांत ऑनलाइन पद्धतीने, तर ७२ तासांत मूळ अहवालाची प्रत विद्यापीठाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

विविध महाविद्यालयांनी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी तात्कालिक स्वरूपात नियुक्त करण्यात येणाऱ्या अध्यापकांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. या मागणीचा विचार करून विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत आणि स्थानिक निवड समितीमार्फत नियुक्त अध्यापकांच्या शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत संबंधित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी स्थानिक निवड समितीचे आयोजन करून शिक्षक मान्यतेसाठीचे प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करणे अनिवार्य आहे.

Pune University
Pune University : चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाराष्ट्रातील विद्यापीठांचे जाहीर वाभाडे : IIT लेव्हलचे संशोधन करण्यासाठी मार्गदर्शक मंडळाचा प्रस्ताव

आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक

निवड झालेल्या अध्यापकांची शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, यापूर्वीची मान्यता पत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच, या कागदपत्रांच्या छायांकित प्रती स्थानिक निवड समितीच्या मूळ अहवालासोबत विद्यापीठाकडे सादर कराव्या लागणार आहेत.

Pune University
Pune University : पुणे विद्यापीठ प्राध्यापक भरती : 6 हजार उमेदवारांवर टांगती तलवार; तांत्रिक पेचामुळे 'करिअर' धोक्यात?

मुदतीनंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत

विद्यापीठाने दिलेल्या मुदतीतच संबंधित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीनंतर तात्कालिक स्वरूपातील शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. तसेच, यापुढे या प्रक्रियेसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com