Pune University : पुणे विद्यापीठ प्राध्यापक भरती : 6 हजार उमेदवारांवर टांगती तलवार; तांत्रिक पेचामुळे 'करिअर' धोक्यात?

Pune University professor recruitment crisis : विद्यापीठातील १११ रिक्त जागांसाठी साधारण ९ हजार इच्छुकांनी अर्ज केले आहेत. मात्र, राज्य शासनाने भरती प्रक्रियेदरम्यान नियमावलीत तब्बल तीनवेळा बदल केले. सुरुवातीला गुणांचे सूत्र ८०:२० असे होते, जे नंतर बदलून ६०:२०:२० म्हणजेच संशोधन ६०, अध्यापन कौशल्य २०, मुलाखत २० असे करण्यात आले.
Pune University
Pune University professor recruitment faces technical issues, putting 6000 candidates at risk. ATR form errors may impact careers.
Published on
Updated on

Pune News, 26 Apr : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया आता एका मोठ्या कायदेशीर आणि तांत्रिक पेचात अडकली आहे. अर्जातील 'एटीआर' शैक्षणिक, अध्यापन, संशोधन तपशील अपूर्ण असल्यामुळे तब्बल सहा हजार उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

विद्यापीठातील १११ रिक्त जागांसाठी साधारण ९ हजार इच्छुकांनी अर्ज केले आहेत. मात्र, राज्य शासनाने भरती प्रक्रियेदरम्यान नियमावलीत तब्बल तीनवेळा बदल केले. सुरुवातीला गुणांचे सूत्र ८०:२० असे होते, जे नंतर बदलून ६०:२०:२० म्हणजेच संशोधन ६०, अध्यापन कौशल्य २०, मुलाखत २० असे करण्यात आले.

या नवीन निकषानुसार उमेदवारांना त्यांच्या संशोधन आणि अध्यापनाचा सविस्तर 'एटीआर' फॉर्म भरणे अनिवार्य होते. विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाहीत. शासकीय निर्णयातील वारंवार होणारे बदल आणि माहितीचा अभाव यामुळे अनेक उमेदवारांनी जुन्याच पद्धतीने अर्ज भरले, तर काहींनी एटीआरचा रकाना रिकामाच ठेवला. आता याच तांत्रिक मुद्द्यावर ६० गुणांचे मूल्यांकन कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

Pune University
Jayant Patil : "एका 'देवा'ला शेतकऱ्यांची सुपीक जमीन..."; शक्तिपीठ महामार्गावरून जयंत पाटलांचा CM फडणवीसांना टोला

उमेदवारांचे म्हणणे आहे की बदललेली नियमावली आणि तांत्रिक गुंतागुंत यामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 'युजीसी'च्या मूळ नियमांनुसार व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान प्रशासन सुधारित ६०:२०:२० सूत्रावर ठाम असले तरी, एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार बाद झाल्यास भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

Pune University
Trump Attack : गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच आले समोर; चेहऱ्यावर भीती, हल्लेखोराचं नाव घेत म्हणाले, "इराणचा..."

त्यामुळे एटीआर सादर न केलेले उमेदवार तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरत असले, तरी प्रशासकीय पातळीवर सकारात्मक हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. पात्र उमेदवारांना केवळ एका अर्जामुळे संधी नाकारण्याऐवजी, त्यांना त्रुटी सुधारण्यासाठी वेळ देता येईल का? याबाबत विद्यापीठ प्रशासन कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com