Rishiraj Sawant : ऋषीराज सावंतच्या बँकॉक ट्रीपचे रहस्य अखेर उलगडले; पोलिस जबाबात काय काय सांगितले?

Bangkok Trip Secret : एका खासगी विमानाने ७८ लाख ५० हजार रुपये देऊन ऋषीराज सावंत हा त्यांच्या दोन मित्रांना सोबत घेऊन बँकॉकच्या दिशेने निघाला होता. मात्र, ऋषीराज याने त्याच्या घरी बँकॉकला जाण्याबद्दल सांगितले आहे का नाही, याबद्दल त्याचे मित्र अनभिज्ञ होते.
Tanaji Sawant-Rishiraj Sawant
Tanaji Sawant-Rishiraj SawantSarkarnama
Published on
Updated on

Pune, 11 February : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा सोमवारी (ता. १० फेब्रुवारी) दुपारी गायब झाला होता, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली होती, सिंहगड पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतली होती. मात्र, सायंकाळी या प्रकरणाला वेगळचे वळण मिळाले आणि साडेनऊच्या सुमारास ऋषीराज सावंत हा पुण्यात दाखल झाला. पण, तो बॅंकॉकला कशासाठी निघाला होता, यावरून तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. मात्र, आता खुद्द ऋषीराज यानेच बँकॉकला जाण्याचे कारण सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

ऋषीराज सावंत (Rishiraj Sawant) आणि त्याचे दोन मित्र हे पुण्यातील लोहगाव विमानतळावरून चार्टर्ड विमानाने बॅंकॉकला निघाले होते. मात्र, पुण्यात तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी ऋषीराज सावंत हा लोहगाव विमानतळावर शेवटचे दिसून आल्याचे स्पष्ट झाले.

तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपली राजकीय पॉवर वापरत ऋषीराजचे विमान चेन्नई विमानतळावर उतरवले. तेथून त्यांना परत येण्यास भाग पाडले आणि सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ऋषीराज सावंत हा आपल्या दोन मित्रांसमवेत पुण्यातील विमानतळावर उतरला. त्यामुळे ऋषीराज सावंत याच्या गायब होण्याचे संपूर्ण राज्याला कुतूहल होते. त्यावर ऋषीराज यानेच स्पष्टीकरण दिले आहे.

Tanaji Sawant-Rishiraj Sawant
Tanaji Sawant : राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले ऋषिराज सावंतांच्या गायब होण्याचे कारण; तानाजी सावंतांवर गुन्हा नोंदविण्याचीही केली मागणी

ऋषीराज सावंत याने ‘बिझनेस ट्रीप’साठीच मी दोन मित्रांसमवेत बँकॉकला चाललो होतो, अशी कबुली पोलिसांना दिली आहे. ऋषीराज सावंत याच्या सोबत असलेल्या त्याचा दोन मित्रांचेही जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. ऋषीराज सावंत याच्यासोबत प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर हे दोन मित्र होते. त्यांचेही जबाब पोलिसांनी नोंदवले आहे.

Tanaji Sawant-Rishiraj Sawant
Murlidhar Mohol: तानाजी सावंतांनी 'पॉवर' वापरली अन् बँकॉकला निघालेलं विमान हवेतूनच माघारी फिरलं, मंत्री मोहोळ ठरले 'गेमचेंजर'

एका खासगी विमानाने ७८ लाख ५० हजार रुपये देऊन ऋषीराज सावंत हा त्यांच्या दोन मित्रांना सोबत घेऊन बँकॉकच्या दिशेने निघाला होता. मात्र, ऋषीराज याने त्याच्या घरी बँकॉकला जाण्याबद्दल सांगितले आहे का नाही, याबद्दल त्याचे मित्र अनभिज्ञ होते. या दोन मित्रांपैकी एक मित्र हा सावंत यांच्या एका संस्थेत कार्यरत आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com