Omraje Nimbalkar : ओमराजेंच्या विरोधात निकाल, 'ऑपरेशन टायगर'नंतर मतदारसंघात परतणार? सगळंच अधांतरी, सुरक्षाही वाढवली

Opration Tiger and Pawan Raje Nimbalkar Case : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडून ऑपरेशन टायगर पूर्ण केल्याची सध्यातरी अशीच चर्चा आहे.
Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ऑपरेशन टायगर पूर्ण करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार गळाला लावत त्यांनी पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप आणला असून याचा मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला आहे. दरम्यान पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणात खासदार ओम राजेनिंबाळकर यांना मोठा धक्का बसला असून एकीकडे ज्यासाठी शिवसेना सोडली ते तर मिळालचं नाही उलट आता जनतेच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर ओम राजेनिंबाळकर पुण्यातील त्यांच्या घरी परतले असून सध्या घराबाहेर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून सर्वाधिक संताप हा खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याविरोधात व्यक्त होत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून याआधीच त्यांना जनतेनं धारेवर धरलं आहे. तर 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

एकीकडे याप्रकरणी सुरू असलेला न्यायालयीन खटल्याचा निकाल आपल्या बाजूने हवा असेल तर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करा अशी त्यांनी ऑफर होती अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते राणा जगजीतसिंह पाटील यांच्याकडून होणारी कोंडी, निधीबाबत अडचणींमुळेच शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा ओम राजेनिंबाळकर यांनी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरेंचा हात सोडताच ओमराजेंना मोठा धक्का! हजारो फॉलोअर्सनी केलं अनफॉलो

मात्र शनिवारी (20 जून) लागलेल्या निकालाने सर्वच फासे उलटे पडले असून पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे. या हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर ते आता या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

या सर्व गदारोळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड चिड निर्माण झाली असून मुंबई सत्र न्यायालयाबाहेर ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसैनिकांनी ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा निषेध केला. तसेच गद्दारी केली त्यांना विरोध करणारच अशी शिवसैनिकाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान या निकालानंतर ओम राजेनिंबाळकर आणि शिंदेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आणि त्यांचे भाऊ यांच्यासह पुण्यातील बानेर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. या पार्श्वभूमिवर येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगर'मध्ये ओमराजेंची सस्पेन्स एन्ट्री; 20 जूनपर्यंत 'वेट अँड वॉच'चा फॉर्म्युला!

यानिकालानंतर आता ऑपरेशन टायगर फेल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून या निकालानंतर ओम राजेनिंबाळकर यांनी आपला शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं सांगितलं आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मतदारसंघात जाऊन लोकांबरोबर चर्चा करुन राजकीय निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com