MLC election controversy : ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांच्या मनातही एकनाथ शिंदे; बाळा मानेंच्या वक्तव्याचा दाखला देत शंभूराज देसाई यांनी सुनावले खडेबोल

Shambhuraje Desai News : तुमच्या लोकांनी ऐनवेळेला अर्ज का काढले याचा आधी खुलासा संजय राऊत यांनी करावा. उमेदवारांनी माघार का घेतली? याचे स्पष्टीकरण द्या. दीडशे कोटी, दोनशे कोटी असे मोठ्या आकडे सांगण्यापेक्षा त्याचा पुरावा द्या.
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार करत संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. इतकेच नव्हे तर राऊत यांनी हवेतील गप्पा न मारता पुरावे द्यावेत, असे आवाहन केले आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री देसाई यांनी हे विधान केले आहे.

तुमच्या लोकांनी ऐनवेळेला अर्ज का काढले याचा आधी खुलासा संजय राऊत यांनी करावा. उमेदवारांनी माघार का घेतली? याचे स्पष्टीकरण द्या. दीडशे कोटी, दोनशे कोटी असे मोठ्या आकडे सांगण्यापेक्षा त्याचा पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांच्या मतांची बेरीज जर पाहिली, तर त्यापुढे महाविकास आघाडीचा टिकावच लागत नाही. पण संजय राऊतांच्या कुठल्याच वक्तव्याला काहीही तथ्य नाही, असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी हाणला.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
Maharashtra Politics Live Update : एसटीचा प्रवास लवकरच महागणार? भाडेवाढीचे संकेत

नाशिकमधल्या दोन गीते बंधूंपैकी एकाने अर्ज माघारी घेतला आहे. दुसऱ्या गीते बंधूंचा अर्ज काल वेळेत माघारी घेता येऊ शकला नाही. शिवसेनेच्या वतीने जेष्ठ मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन तिथे आहेत. कदाचित चर्चेतूनही एखादा चांगला तोडगा निघू शकेल, असेही मंत्री देसाई म्हणाले.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
Shivsena UBT : कोकणात राजकीय भूकंप! 'MLC' त बाळ मानेंनी अर्ज मागे घेताच कारवाईचा बडगा; थेट पक्षातून हाकालपट्टी

बाळा माने यांनी उबाठा सेनेकडून अर्ज भरला होता. कालपर्यंत संजय राऊत म्हणायचं की बाळा आमचे उमेदवार आहेत. महायुतीला कोकणात त्यांची जागा दाखवणार. कोकणात उबाठा प्रबळ आहे, अशी त्यांची वाक्य होती. जेव्हा बाळा माने यांना कळाले की येथे आपल्याकडे संख्या बेरीजच नाही. आपला टिकाऊ लागणार नाही. तेव्हा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज मागे घेतला. मग लगेच बाळा माने वाईट झाले लगेच संजय राऊत त्यांच्यावर बोलायला लागले.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
Uddhav Thackeray Setback : शेवटच्या दिवशी नितेश राणेंनी गेम फिरवला; ठाकरेंनी विश्वास टाकलेल्या नेत्याचा 'MLC' तून यू-टर्न, महायुतीचा उमेदवार बिनविरोध

बाळा माने विनायक राऊतांबद्दल काय म्हणाले हे आधी पहा. अनेक लोक अशी आहेत की उबाठामध्ये की ती आतून शिंदे साहेबांना मानतात. ते उघड सांगतात की काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आम्ही इथे राहिलोय. अनेक जण शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. बाळा माने बोलल्यामुळे त्यांच्या त्यांच्यातीलच आतल्या गोष्टी बाहेर आल्या. बाळा मानेंच्या वक्तव्यांमुळे उद्धव ठकरे यांच्या सेनेत आतमध्ये काय चालले हे महाराष्ट्रातील जनतेला कळाले असल्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
Sangli-Satara MLC : ‘सांगली-सातारा’मधून शिवसेनेचे तानाजी पाटील यांची माघार; जयंतरावांच्या शिलेदाराचीही तलवार म्यान

महायुतीमध्ये मोठा पक्ष भाजप आहे. त्या खालोखाल शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आहे. जर आमच्यात बेबनाव असता, तर मला दोन दिवस सांगलीला पाठवून तानाजी पाटलांचा अर्ज माघारी घ्यायला लावला नसता. किरकोळ कुरबुरी सगळ्याच पक्षात चालतात. तीन पक्षांचे सरकार म्हणजे कुठं तरी भांड्याला भांड लागते. मात्र, त्याचा आवाज घराच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेत असतो, असे मंत्री देसाई म्हणाले.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Shambhuraj Desai
MLC Election : सांगली-साताऱ्यात भाजपचा गेम होणार? शिवसेनेच्या तानाजी पाटलांचं बंड; बंडखोरीला राष्ट्रवादीच्या सदस्यांचीही साथ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com