Jawali APMC : शशिकांत शिंदे, मकरंद पाटलांचा भाजपला हात; दीपक पवारांची पवारांकडे तक्रार

Satara NCP राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्याची तक्रारही श्री. पवार यांच्याकडे केली. त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.
Sharad Pawar, Deepak Pawar
Sharad Pawar, Deepak Pawarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Jawali APMC News : जावळी बाजार समितीत महाविकास आघाडीत फूट पडली असून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंसोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde व मकरंद पाटील Makrand Patil यांनी एकत्र येत पॅनेल उभे केले आहे. यातून शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांनी भाजपशी हात मिळवणी केल्याने यावरुन नाराज झालेले राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार Deepak Pawar यांनी आज खासदार शरद पवार Sharad Pawar यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. याबाबतची तक्रार त्यांच्या कानावर घातली. त्यावर श्री. पवार यांनी पुढील महिन्यात दौऱ्यावर आल्यावर मी याबाबत स्पष्ट बोलेन असे त्यांनी सांगितले.

जावळी-महाबळेश्वर बाजार समितीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांनी एकत्र येत पॅनेल उभे केले आहे. तर विरोधात राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी दुसरे पॅनेल उभे केले आहे. येथे राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे.

यावरुन नाराज होऊन राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी आज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. तसेच जावळी बाजार समितीतील राजकिय परिस्थितीची माहिती त्यांच्या कानावर घातली. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्याची तक्रारही श्री. पवार यांच्याकडे केली. त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.

Sharad Pawar, Deepak Pawar
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे किती आमदार; त्यांनी आत्मपरिक्षण करावे...शंभूराज देसाई

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार हे जावळीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जावळीत चमत्कार घडेल असे सांगितले होते. पण त्यांची पाठ फिरताच दोन आमदारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने दीपक पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Sharad Pawar, Deepak Pawar
Deepak Kesarkar Statement : शिंदे सरकार राज्यातील खासगी शाळा ताब्यात घेणार? शिक्षणमंत्री केसरकरांचं मोठं विधान

अशी विरोधकांशी हात मिळवणी आमदारच करु लागल्यास जिल्ह्यात पक्ष कसा वाढेल, अशी खंतही दीपक पवार यांनी श्री. पवार यांच्या पुढे व्यक्त केली. यावर खासदार शरद पवार यांनी पुढील महिन्यात मी सातारच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यावेळी याविषयी मी स्पष्ट बोलेन, असे सांगितले.

Sharad Pawar, Deepak Pawar
Jawali News: उदयनराजेंनी घातले जावलीत लक्ष; आमदार गट अस्वस्थ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com