Shivsena News : खासदार श्रीकांत शिंदेंच्या मराठवाडा दौर्‍यात पक्षातील कुरबुर चव्हाट्यावर, नांदेडमध्ये 'हम साथ साथ है'चा दिखावा?

Shiv Sena internal conflict News : खासदार श्रीकांत शिंदे हे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. तिथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात पक्षांतर्गत मोठा विरोध समोर आला.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics News : शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे सध्या मराठवाडा दौर्‍यावर आहेत. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षाला मिळालेले यश-अपयश याचा आढावा, पक्षांतर्गत कुरबुरी, गटबजी या सगळ्याचा आढावा शिंदे यांच्याकडून घेतला जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. तिथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात पक्षांतर्गत मोठा विरोध समोर आला.

नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी नेत्यांसमोर आपल्या गटबाजी प्रदर्शन नको, याची काळजी घेत महापालिका निवडणुकीतील मतभेद तूर्तास बाजूला ठेवत बॅनरवर 'हम साथ साथ है' हे दाखवण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यात चांगली ताकद असलेल्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले आणि त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसला. नांदेड शहरातील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांची भाजपशी जुळवून घेण्याची भूमिका मान्य न झाल्याने आमदार हेमंत पाटील, आनंद बोंढारकर, बाबुराव कदम यांनी वेगळा मार्ग निवडला.

Shrikant Shinde
Maharashtra Politics Live Update : शिरूर तालुक्यात नवरा बायकोकडून हवेत गोळीबार;पोलिसांत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेत फूट पाडली, स्वबळावर बहुमतासह महापालिकेत कमळ फुलवले. बालाजी कल्याणकर यांना हाताशी धरून हेमंत पाटील, आनंद बोंढारकर, बाबुराव कदम या त्रिकुटाला दूर ठेवले. थेट शिवसेनेशी युती न करता अशोक चव्हाण यांनी शहरी भागावर आपले वर्चस्व कायम राखण्याची यशस्वी खेळी केली. तर आपलंच नाणं खोटं निघालं म्हणत पाटील-बोंढारकर-कदम या तीन आमदारांनी कल्याणकर यांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केली.

Shrikant Shinde
Shivsena News : झेडपीतील नाचक्कीला पालकमंत्री शिरसाट, खासदार भुमरे की आमदार सत्तार जबाबदार?

मीनल पाटील यांना आधी पक्ष प्रवेश आणि नंतर महापालिकेची अपक्ष उमेदवार असताना शिवसेनेच्याच तीन आमदारांनी त्यांचा उघडपणे केलेला प्रचार याचा फटका बालाजी कल्याणकर यांना बसला. शिवसेनेत फूट पडल्याचा फायदा उचलत अशोक चव्हाण यांनी महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवले. महापालिका निवडणूकीत हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

Shrikant Shinde
Shiv Sena Crisis : शिंदेसेनेचे आमदार-खासदार आमच्याही संपर्कात! ठाकरेंच्या शिलेदाराचा दावा, राजकारणात खळबळ

भाजपसोबत (BJP) युती न केल्याने नुकसान अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पक्षाचे झाले नाही तर ते शिवसेनेचे झाले. राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. आता या सगळ्या राजकीय घडामोडींचा आढावा, याला जबाबदार कोण? याचा आढावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील आढावा बैठकीत घेतला जाईल. अशावेळी पक्षातील गटबाजीचे त्यांच्यासमोर प्रदर्शन नको, याची काळजी स्थानिक नेते, आमदारांनी घेतली.

Shrikant Shinde
Shivsena News : झेडपीतील नाचक्कीला पालकमंत्री शिरसाट, खासदार भुमरे की आमदार सत्तार जबाबदार?

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या स्वागतासाठी नांदेड शहरात लागलेल्या स्वागत बॅनरवर महापालिका निवडणुकीत विखुरलेले गेलेले चारही आमदार हसऱ्या चेहर्‍यांनी दिसले. हे हास्य किती खरे, किती खोटे? हे खासदार शिंदे यांची नांदेडमधून पाठ फिरल्यावर समोर येईलच. तुर्तास शिंदेसेनेत 'आॅल इज वेल' असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. राज्याच्या सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला अशोक चव्हाण यांनी महापालिकेच्या सत्तेतून बाहेर ठेवले.

Shrikant Shinde
Eknath Shinde strategy: राज्यसभा हुकलेल्या नेत्याला आता थेट केंद्रात मोठी जबाबदारी? एकनाथ शिंदेंच्या आश्वसनांनंतर नाराजी दूर होणार

कधी काळी महापालिकेत शिवसेनेचा दबदबा होता. पक्ष फुटीनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत तो नाहीसा झाला. नगरसेवकांची संख्या घटली, जिल्ह्यातील आमदार एकत्र नाहीत हे चित्र पक्षाच्या वाढीसाठी मारक ठरत आहे. अशावेळी श्रीकांत शिंदे पक्षातील गटबाजीवर काय तोडगा काढतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षाच्या वतीने लोकसभा संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांचा पहिलाच नांदेड दौरा आहे.

Shrikant Shinde
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये अस्वस्थता! ऑपरेशन टायगर होणारच; शिंदेंच्या मंत्र्याने दिले ओपन चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com