Shirala Nagar Panchayat : शिराळा नगरपंचायतीसाठी इच्छुकांचे कायपण, बंडखोरांनी युती-आघाडीची झोप उडवली

Local Body Elections : सध्याचे राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजपचे सध्याचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख आहेत. तर सम्राट महाडिक यांच्याच घरात भाजपचे जिल्हाध्यक्ष पद आहे. शिवाय युती सरकारनं नागपंचमी सण साजरा करण्याच्या अटी शिथिल केल्यानंतर शिराळकरांचा कौल हा काही अंशी युतीच्या बाजूने झुकला आहे.
Local-Body-Elections
Local-Body-ElectionsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News : सांगली जिल्ह्यातील दुर्गम भाग समजला जाणारा शिराळा तालुका! याच शिराळा नगरपंचायतीसाठी इच्छुकांनी काय पण करण्याची तयारी ठेवली आहे. त्याची महाविकास आघाडीतील पक्षांना आणि महायुतीतील घटक पक्षांना देखील धास्ती आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळो अगर ना मिळो आपण निवडणुकीच्या रिंगणात असणार हा बेतच इच्छुकांनी आखला आहे. त्यामुळे ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी दबक्या पावलाने व्यूहरचना आणि तयारी जोराची ठेवली आहे.

शिराळा नगरपंचायतीतील राजकारण पाहिले तर मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) हे विजयी झाले होते. त्याचा फायदा नगरपंचायतीच्या निवडणुकीत झाला. मानसिंगराव नाईक यांच्या गटाची सत्ता या नगरपंचायतीवर आली.

तिरंगी लढत होत असताना माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गटाने अकरा, तर शिवाजीराव नाईक सम्राट महाडिक यांच्या गटाने 6 जागांवर विजय मिळवला होता. तर सध्याचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला होता.

सध्याचे राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजपचे सध्याचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख आहेत. तर सम्राट महाडिक यांच्याच घरात भाजपचे जिल्हाध्यक्ष पद आहे. शिवाय युती सरकारनं नागपंचमी सण साजरा करण्याच्या अटी शिथिल केल्यानंतर शिराळकरांचा कौल हा काही अंशी युतीच्या बाजूने झुकला आहे.

Local-Body-Elections
Beed News : बीडमध्ये एकाच म्यानात दोन तलवारी ; पंकजा मुंडे निवडणुक प्रभारी, तर सुरेश धस प्रमुख!

पण स्थानिक पातळीवर गटातटाला महत्त्व असते. त्यामुळे या निर्णयानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्याने शिराळात नगरपंचायतीतील कौल कोणाला मिळणार याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.

शिराळा नगरपंचायतीसाठी 17 जागांसाठी निवडणूक होणार असून एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले झाल्याने अनेकांची भाऊगर्दी या नगराध्यक्ष पदासाठी आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांची देखील चढाओढ वाढली आहे. त्यासाठी भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या शिवसेनेत अधिक रस्सीखेच निर्माण झाली आहे.

Local-Body-Elections
Ajit Pawar On Parth Pawar: अजितदादांची पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'चार ते पाच महिन्यांपूर्वीच माझ्या कानावर...'

आमदार भाजपचे खासदार शिवसेनेचे असल्याने दोन्ही कडील कार्यकर्त्यांच्या आशा अधिकच रुंदावले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीसाठी काय पण? हीच भूमिका घेऊन अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com