Madha Lok Sabha 2024 : पवारांवर हल्लाबोल करत ठाकरेंच्या शिलेदाराने माढ्यातून अपक्ष दंड थोपटले!

Laxman Hake independent Candidate in Madha : लक्ष्मण हाके यांनी हातात संविधानाची प्रत आणि महात्मा फुले यांची वेशभूषा करत माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 19 April : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज (ता. १९ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माढ्यातून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे हाके यांनी महात्मा ज्याेतिराव फुले यांची वेशभूषा करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. हाके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे माढ्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे राज्याचे प्रवक्ते आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर प्रा. लक्ष्मण हाके यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शहाजी पाटील आणि शिंदे गटाकडून होणाऱ्या टीकेला हाके यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर ठाकरेंनी त्यांना राज्याचे प्रवक्ते बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Laxman Hake
Madha Lok Sabha 2024 : फडणवीस, पवारांना भेटलेले जानकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार की स्वतंत्र अस्तित्व ठेवणार?

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी हातात संविधानाची प्रत आणि महात्मा फुले यांची वेशभूषा करत माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दखल केला आहे.

लक्ष्मण हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या वेळी आयोगाच्या सदस्यांवर येणारा दबाव आणि सरकारच्या हस्तक्षेपामुळे हाके यांनी आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. हाके हे मूळचे सांगोल्याचे आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते मैदानात उतरल्याने महाविकास आघाडीत बंडखोरी होणार की उद्धव ठाकरे हे लक्ष्मण हाके यांची समजूत घालणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महात्मा फुले हे हंटर कमिशनपुढे शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत गेले हेाते. फुले हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. सध्याची लोकशाही ती मोजक्य गब्बरगंड आणि पैसेवाल्या लोकांच्या हाती गेलेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात बारा ते तेरा लाख ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्ग आहे. मात्र, हा ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्गातील माणूस चांगल्या प्रकारे लढत देऊ शकेल की नाही, अशी परिस्थिती आहे. येथील शेतकरी, भटके विमुक्त, ओबीसींचे प्रश्न डावलण्यात येत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

Laxman Hake
Solapur Lok Sabha 2024 : ‘एमआयएम’ची सोलापुरातील माघार कुणाच्या फायद्याची?

त्यांना अठरा पगड जातींचे प्रश्न माहिती आहेत का?

मी स्वतः धनगर समाजातून येतो. माढा लोकसभा मतदारसंघात सहा ते सात लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे. मात्र गेल्या ७५ वर्षांत लोकसभेत एकही खासदार जाऊ शकलेला नाही. म्हणजे गावगाड्यातील अठरा पगड जातीचे प्रतिनिधित्व या लोकशाहीमध्ये कसे होणार आहे. त्यामुळे महात्मा फुलेंच्या विचारांची आजही गरज आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि निंबाळकरांना अठरा पगड जातीचे प्रश्न माहिती आहेत का. माढ्याचे विद्यमान खासदार धनगर समाज आरक्षण आणि ओबीसींना पंचायत राजमधून डावलणे, याबाबत एकदाही बोलले नाहीत.

Laxman Hake
Madha Lok Sabha 2024 : डॉ. अनिकेत देशमुखांची माढ्यातून माघार; पवारांची भेट अन्‌ वरिष्ठ नेत्यांचा सल्ला मानला

माझी लढाई मोहिते पाटलांशी

माझी लढाई ही सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेतील सर्वांत मोठे डिफ्लॉटर आहेत, त्या मोहिते पाटील यांच्याशी आहे. निंबाळकर यांचं तर आम्ही डिपॉझिट जप्त करू. शरद पवार यांनी धनगर समाजाला एक तिकीट देण्याची दानत दाखवली नाही. त्याचे प्रत्यंतर इतर मतदारसंघात त्यांना भोगायला मिळेल. महादेव जानकर हे महायुतीसोबत गेल्यानंतर सात लाख लोकसंख्येतून त्यांना एक धनगर समाजातून एक उमेदवार भेटू शकत नाही का, आम्ही कारखानदार नाही म्हणून तुम्ही आम्हाला टाळता का, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी पवारांना केला.

R

Laxman Hake
Vijaydada Active in Politics : राष्ट्रवादीत प्रवेश करताच विजयदादा पुन्हा सक्रिय; सोपल, राजन पाटलांची घेतली भेट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com