

-ऋषिकेश पवार
Khatav News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कामांना अधिकचा निधी आणि वाढीव दोन टीएमसी पाणी उपलब्ध केल्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या खटावमधून आगामी आठ महिन्यांत ‘दुष्काळ’ हा शब्द कायमचा हद्दपार होणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी केले.
नेर (ता. खटाव) येथे कै. लक्ष्मणराव इनामदार Laxmanrao Enamdar जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेंतर्गत उत्तर खटावमधील वंचित गावांना लिफ्ट १, लिफ्ट २ च्या माध्यमातून पाणी देण्याच्या योजनेच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी महेश शिंदे Mahesh Shinde बोलत होते.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, बुधचे माजी सरपंच अभय राजेघाटगे, नेरचे सरपंच सुरेश चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन अण्णा वलेकर, संचालक राहुल फडतरे, नवनाथ फडतरे, राहुल पाटील, पुसेगाव, खटाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे म्हणाले, जाणते नेते म्हणवून घेणाऱ्यांच्या पाठीशी हा भाग कायम ठामपणे उभा होता. मात्र, खटावची तहान भागवावी, असे त्यांना कधीच वाटले नाही. याउलट ही योजना परवडणारी नसून खटाव तालुक्याला स्वप्नातसुद्धा पाणी मिळणार नाही, अशा वल्गना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मोठी एमआयडीसी उभारणार
सातारा-कोरेगाव-पुसेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग तसेच पुणे-सांगली-बंगळूर कॉरिडॉर पण कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. काही महिन्यांत मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात योजनेचे पाणी पोचणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना याच भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत येथे उभी करणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.