

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या शिफारशीवर नगरसेवक झालेल्या पदाधिकाऱ्याला पुणे पदवीधरमधून उमेदवारी द्यावी असे पत्रक उपशहरप्रमुखांने काढल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद आणखी बळावला आहे. जिल्हाप्रमुख आणि उपनेते यांच्या अनुपस्थिती आणि पूर्व कल्पना न देता प्रसिद्ध पत्र काढल्याने उपनेते आणि जिल्हा प्रमुखांनी उपशहर प्रमुख युवराज खंडागळे यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
शिवाय कोल्हापूर जिल्ह्याचे लोकसभा आणि विधानसभा सहसंपर्कप्रमुख अरुण दूधवढकर यांनी अशा प्रकारची गंभीर दखल घेणे आवश्यक असताना त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कोल्हापूर शहरातील ठाकरे शिवसैनिकांमध्ये अद्यापही धुसपुस सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील गाडी रुळावर येत असताना पुन्हा एकदा पुणे पदवीधर च्या उमेदवारी मागणीवरून पक्षांतर्गत खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक असलेल्या सुनील मोदी यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेतून उमेदवारी द्यावी, अशी मागणी उपशहर प्रमुख युवराज खंडागळे यांनी प्रसिद्ध केले होते. या मागणीनंतर ठाकरे गटातील वातावरण अधिकच चिघळले आहे.
शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्याशी सरकारनामाने संपर्क साधल्यानंतर संदर्भातील कोणतीच बैठक झालेली नाही. शिवाय या बैठकीस संदर्भात आम्हाला कोणालाच कल्पना नसल्यामुळे जिल्हाप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्याची सांगण्यात आले होते.
अशी कोणतीच बैठक ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आलेली नाही. शिवाय या बैठकीची आम्हाला कल्पना देखील नाही. अशा पद्धतीची बैठक घेत असताना जिल्हाप्रमुखांना कळवणे अपेक्षित होते. आमच्या गैर उपस्थितीमध्ये अशा बैठका होऊन मागणी होत असेल तर आम्ही पदाधिकाऱ्यांच्यावर कारवाई करू. आम्हाला मातोश्रीवरील आदेश महत्त्वाचा आहे. उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय मातोश्रीवरूनच जाहीर केला जाईल. अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना दिला होता.
या संपूर्ण प्रकरणानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यां बैठकीमध्ये उपशहरप्रमुख युवराज खंडागळे यांना उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख युवराज पाटील यांनी चांगलंच फैलावर घेतले. मात्र सहसंपर्कप्रमुख दूधवढकर मोदी यांच्याबद्दल नरमाईची भूमिका घेतली. त्यामुळे पून्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन गट प्रवाहित राहिले. त्याला देखील सहसंपर्कप्रमुखच जबाबदार असल्याचा आरोप खाजगीत शिवसैनिकांकडून होत आहे. पक्षाच्या भूमिके विरुद्ध जाऊन काम करणाऱ्यांना सह संपर्कप्रमुखांकडून पाठीशी घातला जात असल्याचा आरोप देखील होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकऱ्यांचे आदेश आहेत असं सांगून नेहमीच दबाव टाकला जात असल्याचे प्रमुख पदाधिकारी सांगतात. मात्र, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालत असल्याने शिवसैनिक नाराज होत असल्याचं दाखला एका प्रमुख नेत्याने दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.