BJP Opposition Narrative Maharashtra: ज्ञानेश कुमारांविरोधात विरोधी पक्ष एकवटला, प्रत्युत्तरासाठी भाजपही मोठी फौज मैदानात उतरवणार; 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

BJP deploys five leaders against opposition allegations News : विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मोठी फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश भाजपकडून राज्यातील या महत्त्वाच्या नेत्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी सोपवली आहे.
Bjp flag
BJP flagSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यात येत्या काळात होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका त्यासोबतच विरोधकांकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर केले जाणारे आरोप व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यामुळे आता राज्यातील विरोधी पक्ष एकवटला असून, ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे प्रदेश भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मोठी फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश भाजपकडून राज्यातील या महत्त्वाच्या नेत्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी सोपवली आहे.

भाजपने आता विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी मोठी फौज मैदानात उतरवली आहे. त्यामध्ये राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar), नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय कुटे, आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपच्या वतीने मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे.

त्यासोबतच महिला नेत्यांमध्ये आमदार चित्रा वाघ, आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे देखील विरोधकांना उत्तर देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राज्यातील युवा नेत्यांमध्ये आमदार विक्रम पाचपुते, आमदार निरंजन डावखरे व मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विरोधकांनी भाजपला घेरण्यापूर्वीच भाजपने प्रत्युत्तराची तयारी केल्याचे दिसत आहे. येत्या काळात विरोधकांचे आरोप खोडून काढण्याची जबाबदारी या सर्व नेत्यांवर असणार आहे.

Bjp flag
Maharashtra Political Live Update : पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद वस्ते यांचं निधन

भाजपकडून (BJP) आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो प्लॅनिंगला सुरुवात केली आहे. राज्यातील पाच मतदारसंघात लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देखील भाजपची ही खेळ महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे येत्या काळात विरोधकांकडून निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तोच मुद्दा पकडून विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा देखील प्रयत्न सुरू असल्याने आता विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी या नेत्यांवर आहे

Bjp flag
Maharashtra Political Live Update : 'आम्हीच काय तिथे कोणीच काही काजू, बदाम खाण्यासाठी जात नाही....':मंत्री पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारलं

राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हातबल झाला आहे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून महाराष्ट्रात दुष्काळाची घोषणा करण्यात आली. जवळपास राज्याच्या 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु यावरून देखील विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरून येत्या काळात विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची फौज मैदानात उतरली असून विरोधकांचे आरोप खोडून काढण्याची तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com