Abhijeet Patil : ‘अभिजीत पाटलांचं नेमकं काय सुरू आहे? 15 दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळेंनी खडे बोल सुनावलेत’

Raju Khare Claim : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी अभिजीत पाटील यांच्यावर भाजपला छुपी मदत केल्याचा आरोप केला.
Abhijeet Patil
Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 June : ज्येष्ठ नेते शरद पवार मोठे की अभिजीत पाटील मोठे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत त्यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली होती. पवार, मोहिते पाटील घराण्यावर ते आरोप करतात, मग अभिजीत पाटील यांचं नेमकं काय सुरू आहे? त्यांची भाजपला छुपी मदत करण्याची भूमिका दिसून येऊ लागली आहे, अशा शब्दांत मोहोळचे आमदार राजू खरे यांच्यावर विधान परिषद निवडणुकीतील निर्णयावरून हल्लाबोल केला.

वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीबाबत आमदार अभिजीत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत बोलताना राजू खरे यांनी पक्षाच्या बैठकीत घडलेला किस्सा सांगून आमदार पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.

राजू खरे म्हणाले, आमदार अभिजीत पाटील यांनी समजून घेतलं पाहिजं. वसंतराव देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना मला विचारलं गेलं नाही, असा सवाल केला होता. त्यामुळे शरद पवार मोठे की अभिजीत पाटील मोठे?

मागील १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि खासदार यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत अभिजीत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना सर्वांसमोर खडे बोल सुनावले आहेत. अभिजीत पाटील पवार घराण्यावर, मोहिते पाटील घराण्यावर आरोप करतात, मग अभिजीत पाटील यांचं नेमकं काय सुरू आहे, असा सवाल राजू खरे यांनी केला.

Abhijeet Patil
Solapur MLC : सोलापुरात अदृश्य शक्ती चमत्कार घडवेल अन्‌ भाजपला पराभूत करून महाराष्ट्राला एक संदेश देईल : शिंदे समर्थक आमदाराचा दावा

सोलापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. विधानसभेला महाविकास आघाडीचे सहा आमदार निवडून आले आहेत. तीनही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. लोकसभेला भाजपचा पराभव झाला, तर विधानसभेच्या अकरापैकी सहा जागांवर महाआघाडीचे उमेदवार जिंकले आहेत, त्यामुळे हा जिल्हा कधीही भाजपसोबत जाणार नाही, असा दावाही आमदार खरे यांनी केला.

Abhijeet Patil
MP Jyoti Waghmare : धैर्यशील मोहिते पाटलांच्या भेटीनंतर खासदार ज्योती वाघमारेंनी केला मोठा दावा...

मोठ्या निवडणुकीत भाजप हरलाय

ते म्हणाले, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका ह्या गल्लीबोळातील निवडणुका आहेत. कदाचित त्या निवडणुकीत भाजपचा विजय झालेला असेल. पण मोठ्या निवडणुकांमध्ये भाजप हरलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com