

Solapur, 09 June : भाजपने विजयसिंह मोहिते पाटील, शहाजीबापू पाटील आणि काल प्रशांत परिचारक यांना संपवलं. आता राहिले माढ्याचे शिंदे आणि मोहोळचे राजन पाटील. त्यांनाही भाजप आज ना उद्या संपवणारच आहे. जेव्हा आपल्या नेत्यांना भाजप संपवतो, तेव्हा त्यांचे कार्यकर्ते भाजपसोबत कसे राहतील. त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत १०० टक्के चमत्कार होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एक मोठी अदृश्य शक्ती आहे. भाजपकडं बहुमत असलं तरी अदृश्य शक्ती चमत्कार घडवेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक संकेत देईल, असा दावा मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP SP) जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना आव्हान दिले आहे.
देशमुख यांची उमेदवार निश्चित करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही, असे सांगून पक्षाच्या तीन आमदारांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करत विरोधाची भूमिका घेतली आहे. मात्र, राजू खरे (Raju Khare) यांनी देशमुख यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या विजयाची ग्वाही दिली आहे.
ते म्हणाले, उमेदवार ठरविण्याचा अधिकार हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आहे, त्यामुळे शरद पवारांनी वसंतराव देशमुख हा उमेदवार ठरवलेला आहे. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणं, हे पक्षाच्या चारही आमदारांचं काम आहे. ते आमदार व्यक्तीगत काय आरोप करतात, याबाबत मला बोलायचं नाही.
सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना संपवलं. माळशिरसमध्ये मोहिते पाटलांना संपवलं. काल प्रशांत परिचारकांना संपवलं. आता राहिलं कोण तर एक माढ्याचे शिंदे आणि मोहोळचे राजन पाटील. याही लोकांना भाजप आज ना उद्या संपवणारच आहे, असा दावा राजू खरे यांनी केला.
आमच्या पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. इतरांनी माझ्याशी संपर्क साधण्याचे कोणतेही कारण नाही. मी आंबेडकरी चळवळीतून आलेला पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे वसंतराव देशमुख कसे निवडून येतील, यासाठी मी संपूर्ण ताकद पणाला लावणार आहे, असेही आमदार खरे यांनी स्पष्ट केले.
धक्कादायक निकाल
सोलापूरची ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राला एक संकेत देईल. येत्या २० तारखेला मतदान होईल आणि २२ तारखेला माझी प्रतिक्रिया घ्यायला या, तेव्हा धक्कादायक निकाल लागलेला असेल, असा दावाही राजू खरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.