Dhananjay Mahadik on Loksabha: लोकसभेचा उमेदवार कोण असेल? धनंजय महाडिकांचे सूचक विधान

Loksabha Election : भाजप राज्यात 48 जागांची तयारी भाजप करत आहे.
Dhananjay Mahadik on Loksabha :
Dhananjay Mahadik on Loksabha : Sarkarnama

Kolhapur Political News: आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप पूर्वीपासूनच मैदानात उतरले आहे. तर दोन्ही काँग्रेसने विद्यमान शिंदे गटाच्या खासदारांना ठाकरे गटाच्या साथीने चितपत करण्याचा डाव आखला आहे. पण काँग्रेसमध्ये उमेदवारीवर बाजू झटकताना दिसत आहेत. अशातच भाजपचे नेते व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दोन सूचक वक्तव्य करत लोकसभेचा उमेदवार कोण असेल? याचा अंदाज व्यक्त केला आहे. ते नसतील तर महाडिकांची देखील तयारी असल्याचे सांगितले. जर पक्षाने सांगितले तर त्याचीही तयारी आहे. पण वरिष्ठ नेते सांगतील तेच करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

मागील आठवड्यात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमाशी बोलताना पाहिलं सूचक वक्तव्य केलं. धनंजय मडाडिक यांनी लोकसभा निवडणुकीवर बोलताना सांगितले की, भाजप राज्यात 48 जागांची तयारी भाजप करत आहे. कोल्हापुरात दोन्ही खासदार शिंदे गटाचे आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी निवडणुका मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार हे उमेदवार असतील. या दोन्ही जागा शिंदे गटाला गेल्या, तर आम्ही त्यांचा प्रचार करू. पण पक्ष जो आदेश देईल ते करू, असे महाडिक म्हणाले.

तर दुसरे सूचक वक्तव्य म्हणजे, लोकसभेसाठी महाडिक कुटुंबाची तयारी आहे. पण याबद्दल आताच बोलणं योग्य होणार नाही. हा सर्वस्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असल्याचे सांगितले.

Dhananjay Mahadik on Loksabha :
Jaydatta Kshirsagar News : माझा फोटो वापरुन संभ्रम निर्माण करू नका; क्षीरसागरांनी पुतण्याला फटकारले..

2019 च्या लोकसभेच्या पराभवानंतर महाडिक कुटुंबियांना सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे राजकीय अस्तित्व संपते का? अशी चर्चा जिल्हाभरात सुरू होती. मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेत खासदार केल्यानंतर त्यांच्या राजकारणात पुनर्भरणी झाली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांच्या घरात उमेदवारी द्यायची झाल्यास तर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या एकमेव उमेदवार असू शकतील. मात्र त्याला देखील निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांकडून अंतर्गत विरोध होऊ शकतो. त्यामुळे केवळ खासदार धनंजय महाडिक यांनी मोघमपणे बोलून आपली तयारी असल्याचं जाणवून दिले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com