Satara : विकासपुरुष आहात तर लोकसभेला पराभव का झाला... शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

केंद्रात Central Government जाऊन निवेदने देताय, तसं एक निवेदन पालिकेच्या Satara palika मुख्याधिकाऱ्यांनाही CO द्या आणि स्वतःच्या घरासमोरील रस्त्याचे काम तेवढे मार्गी लावा.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करून निवेदन द्यायचे आणि शेकडो कोटींच्या निधीचे आकडे वृत्तपत्रात छापून आणायचे. पण, खरंच किती निधी आणला, आणि तुम्ही एवढे महान विकासपुरुष आहात. तर सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंना केला आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः केलेली कुकर्मे लपत नाहीत. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकाद्वारे खरमरीत प्रत्युत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले की, शासनस्तरावर विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. नुसतं निवेदन देऊन फोटो काढायचा आणि भली मोठी आकडेवारी छापून बातमी प्रसिद्ध करायची, यातून कामे होतात का, असा प्रश्न करून ते म्हणाले, तुम्ही १५ वर्षे खासदार होता, त्यावेळी कार्यबाहुल्याच्या नावाखाली संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. त्यावेळी असे फोटोसेशन का होत नव्हते.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara: पालिकेची निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी.. शिवेंद्रसिंहराजे

पालिकेच्या कार्यकालास चार वर्ष आणि आठ- दहा महिने उलटले, निवडणूक लागलीकीच बरी तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण होते. शेवटच्या महिन्यातच बरं विकासकामांचा पाठपुरावा सुरु होतो. मोठमोठ्या घोषणा होतात आणि याचेच कुतूहल सातारकरांना आहे. कास धरणाची उंची आमच्यामुळे वाढली हे तुम्ही पत्रकातून स्वतः कबुल केले. त्यामुळे याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, दाखवतो सगळ्यांना... खासदार उदयनराजे

पहिल्यांदा तुम्ही खासदार झाला त्यावेळी रेल्वेतून कराडला गेला. आपल्या माहुलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठा स्टंट केला. पुढे कराड आणि माहुली या दोन्ही स्टेशनचा काय कायापालट केलात. केवळ शोबाजी केली. १५ वर्षे खासदार होता पण, केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा अथवा कराडवरून साधी नवीन, जलद रेल्वे तुम्हाला सुरु करता आली नाही. सातारा पालिकेला जेवढा निधी मिळाला, त्यातील ९५ टक्के निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
लबाड लांडग ढाॅंग करतय.. : उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर जहरी टीका

केंद्रातून काय मिळालं, असा प्रश्न करून साताऱ्याची हद्दवाढ जिल्हा परिषदेत कोणी अडवून ठेवली होती. तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी तुम्ही हा प्रश्न रखडून ठेवला होता. त्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून मीच घेतली. हाच तुमचा विकास होता का. नुसतं मंत्र्यांना भेटून फोटो काढून आणि त्यांचा चहा पिऊन विकास होत नसतो, हे सातारकरांना चांगलंच माहिती आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजेंचे प्रयत्न; सातबाऱ्यावरील हस्तांतर बंदीचे शेरे हटले...

नुसतं फोटोसेशन करू नका सातारकरांसाठी खरंच काहीतरी आणा. ज्या बँकेच्या भ्रष्टाचाराची पुंगी सारखी वाजवताय ती बँक कायदेशीररित्या मर्ज केली. कोणाचा एक रुपयाही बुडवला नाही. उलट बँक मर्ज होऊ नये आणि लोकांची अडचण सुटू नये, म्हणून शक्य तेवढे प्रयत्न तुम्ही केले. पण, तुम्हाला यश आले नाही. एवढा तुम्हाला भ्रष्टाचार दिसतोय तर ज्या अजिंक्यतारा कारखान्याच्याबाबतीत नेहमीच गरळ ओकत असता. त्या कारखान्याच्या निवडणुकीला पॅनेल का उभे केले नाही.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

छाती काढून यायचं होत ना सभासदांच्या पुढं. कोणी अडवलं होतं. तुमच्या पत्रकबाजीने तुम्ही केलेली कुकर्मे लपणार नाहीत. सातारा पालिकेत झालेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पहिला आहे. नशीब, पालिका इमारत नागरिकांच्या मालकीची आहे. नाहीतर तीही तुम्ही आणि तुमच्या आघाडीने विकून खाल्ली असती.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
सातारच्या हद्दवाढीचे श्रेय उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले

मला पण भाऊसाहेब महाराजांचा वारसा आहे. सातारकरांसाठी भाऊसाहेब महाराजांनी भरभरून केले आणि सातारकरांनी ते बघितलेही आहे. त्यामुळे मला वारस्याचं सांगू नका. जनतेची कामे करतो, विकासकामे मार्गी लावतो म्हणून मला जनतेची साथ आहे. तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. लोकांची कामे करा आणि त्याबद्दलच बोला. भलता फापटपसारा लावू नका.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
जावळीतील 54 गावांचा पाणीप्रश्न सुटणार; बोंडारवाडीला निधी देणार... अजित पवार

जसे केंद्रात जाऊन निवेदने देताय, तसं एक निवेदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही द्या आणि स्वतःच्या घरासमोरील रस्त्याचे काम तेवढे मार्गी लावा. शहरातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे, हे तुम्हाला का दिसत नाही. सातारकरांचा किती अंत पाहणारा आहात? असा गंभीर प्रश्नही शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे. तुम्ही सातारकरांना कितीही गाजरं दाखवली तरी तुम्ही केलेल्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर लवकरच करतील, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com