Ashadhi Wari : व्हीआयपी दर्शनबंदी काटेकोरपणे पाळताच चार तासांतच होऊ लागले विठ्ठलाचे दर्शन...

Pandharpur Vip Vitthal Darshan : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा पूर्णपणे बंद केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना चार ते पाच तासांत दर्शन होत असून या निर्णयाचे वारकऱ्यांनी स्वागत केले आहे.
Vip Vitthal Darshan
Vip Vitthal DarshanSarkarnama
Published on
Updated on

Pandhrpur, 17 July : पहिल्या दिवसाच्या गोंधळानंतर प्रशासनाने कडक भूमिका घेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा शंभर टक्के बंद केली. त्याचा परिणाम दर्शन रांगेतील भाविकांना अधिक जलद आणि सुलभ दर्शन होण्यासाठी झाला आहे. पूर्वी पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागत होती. आता अवघ्या चार ते पाच तासांत दर्शन होत असल्याने भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी १५ जुलैपासून व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद केली आहे. मंदिर समितीकडून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून, शुक्रवारी दर्शनरांगेत सुमारे ३० ते ३५ हजार भाविक होते.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कोणत्याही परिस्थितीत व्हीआयपी दर्शन दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दर्शनाचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, भोजन, चहा-नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

Vip Vitthal Darshan
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ती’ प्रथा पाळली; येत्या रविवारी पंढरपूर दौऱ्यावर

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी वाखरी येथील पालखी तळाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या. वाखरी चौकातील जोडरस्त्याच्या दुरुस्तीचेही निर्देश त्यांनी दिले आहेत. यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यकारी अभियंता निमकर उपस्थित होते.

वारीतील कामांचे ‘थर्ड पार्टी’ ऑडिट

आषाढी यात्रेसाठी विविध विभागांनी केलेल्या कामांबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वारीनंतर सर्व कामांचे ‘थर्ड पार्टी’ ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली आहे.

Vip Vitthal Darshan
Gram Panchayat Election : ‘ऑक्टोबर हिट’मध्येच तापणार गावगाडा : राज्यातील 15,300, तर सोलापुरातील 702 ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका

वाखरी येथील सेवा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात आली असून, नुकसान झालेल्या रस्त्याची दुरुस्तीही करून घेण्यात आली आहे. पालखी तळावर पाणी साचू नये; म्हणून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली असून, भविष्यात त्या ठिकाणी कायमस्वरूपी मोठे गटार उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com