Pawan RajeNimbalkar News: ओमराजेंच्या विरोधात निकाल,'ऑपरेशन टायगर'ला धक्का? शिंदे-फडणवीसांची थेट अमित शहांशी चर्चा; काय आला आदेश?

Pawan RajeNimbalkar Case Court Verdict: मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण गेली 20 वर्षे ज्या हत्याकांडाभोवती फिरलं त्या तत्कालीन काँग्रेसचे नेते पवन राजेनिंबाळकर प्रकरणाचा निकाल सीबीआयच्या विशेष कोर्टानं शनिवारी दिला. या निकालात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Eknath Shinde  Devendra Fadnavis Amil Jagtap Om RajeNimbalkar  .jpg
Eknath Shinde Devendra Fadnavis Amil Jagtap Om RajeNimbalkar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. याच ऑपरेशन टायगरमध्ये ज्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे, ते धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश ज्यामुळे वेटिंगवर पडला होता, त्या पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाचा निकाल शनिवारी(ता.20) लागला आहे. हा निकाल ओम राजेनिंबाळकरांसाठी मोठा धक्का ठरला. यानिकालानंतर आता ऑपरेशन टायगर फेल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान,आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण गेली 20 वर्षे ज्या हत्याकांडाभोवती फिरलं, त्या तत्कालीन काँग्रेसचे नेते पवन राजेनिंबाळकर प्रकरणाचा निकाल सीबीआयच्या विशेष कोर्टानं शनिवारी दिला. या निकालात राज्याचे माजी गृहमंत्री व भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या निकालानंतर हताश झालेल्या बंडखोर खासदारांमधील ओम राजेनिंबाळकर यांनी आपला शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं सांगत ऑपरेशन टायगरला धक्का दिला. तसेच पुढील राजकीय निर्णय हा मतदारसंघात जाऊन लोकांबरोबर चर्चा करुन घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर काहीच वेळात ऑपरेशन टायगरमुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंनी हे माध्यमांसमोर आले. त्यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याचं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी ओमराजेंच्या पुढील कायदेशीर लढाईबाबत मह्त्त्वाचं विधान केलं.

Eknath Shinde  Devendra Fadnavis Amil Jagtap Om RajeNimbalkar  .jpg
Pawanraje Murder Case Verdict : ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात निकाल, उद्धव ठाकरेंच्या गटातून पहिली प्रतिक्रिया, 'त्यांना कळलं असेल आपलं...'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज कोर्टाचा निकाल आला आहे. सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. कारण पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासह दोन लोकांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हे अतिशय गंभीर प्रकरण होतं. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळेल असा विश्वास कुटुंबीय आणि इतरांना होता, मात्र दुर्दैवाने विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

याप्रकरणी मी स्वत: आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात सीबीआय हायकोर्टात जाऊन अपील करा आणि केस लढवा, असे निर्देश शाह यांनी सीबीआयला दिल्याचं शिंदेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

Eknath Shinde  Devendra Fadnavis Amil Jagtap Om RajeNimbalkar  .jpg
Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता! २० वर्षानंतर आला निकाल

ओम राजेनिंबाळकर काय म्हणाले..?

सीबीआयच्या विशेष कोर्टानं पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.आता या निकालानंतर धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा निकाल अतिशय दुर्दैवी असून त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची पुढील भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

निंबाळकर म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी कुटुंबीय, तपास यंत्रणा आणि संबंधित सर्वजण सातत्यानं प्रयत्न करत होते. मात्र, न्यायालयाचा जो आज निकाल समोर आला आहे, तो निराशाजनक आहे. या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा असून पुढील कायदेशीर लढा सुरूच राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com