Shivsena News : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; शिवसैनिक म्हणून आणखी एका मंत्र्यांने व्यक्त केली इच्छा

Shiv Sena minister News: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक, भरत गोगावले व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत.
Eknath Shinde Sandipan Bhumare
Eknath Shinde Sandipan Bhumare Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या काही दिवसापासून आमदारांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक, भरत गोगावले व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे एकीकडे चर्चेला जोर आला असतानाच दुसरीकडे धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिक म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव असू द्या किंवा प्रताप सरनाईक असू द्या. त्यांनी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री होत असताना संख्याबळाला महत्त्व असते. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महायुती राज्यामध्ये सत्तेत आहे. भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आमचे खासदार, आमदार जास्त आले तर आम्ही मुख्यमंत्रीपदावर दावा करू, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.

Eknath Shinde Sandipan Bhumare
Shivsena News : एकनाथ शिंदे 13 खासदारांच्या बळावर मोठा डाव टाकण्याच्या तयारीत : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यानंतरही दिल्लीतील हालचाली कायम

पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे, असेही यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकाराशी बोलताना विविध प्रश्नाना उत्तरे दिली. त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची नवी कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Eknath Shinde Sandipan Bhumare
Sachin Ahir News: उपसभापतीपदासाठी अर्ज, एकनाथ शिंदे शेजारी, तरी सचिन अहिरांनी पहिली गुगली टाकलीच, म्हणाले,'मी शिवसेना पक्षच सोडलेला नाही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com