

Praful Patel News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विलीनकरणाचा निर्णय 12 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार होता मात्र त्यापूर्वी त्यांचे अपघाती निधन झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सांगत आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, खासदार प्रफुल पटेल यांनी विलीनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले की,आमचे नेते अजित पवार यांच्या दुर्देवी निधनामुळे आम्हाला विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा करायची नाही. तसेच अपघातापूर्वी आपण अजित पवारांना फोन केला होता. मात्र, तो खासगी फाईलसाठी फोन केला नव्हता. तर, शेतकऱ्यांसाठी फोन केला होता, असे देखील त्यांनी सांगितले.
प्रफुल पटेल म्हणाले, 'विलीनीकरणाच्या चर्चेपेक्षा आम्हाला आमच्या पक्षाला सावरण्याचे काम महत्वाचे वाटते. आमच्या नेत्यांनी,आमदारांनी सुनेत्रावहिनी पवार यांना विधीमंडळाचा नेता निवडलेले आहे. त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ झाली. येत्या 26 तारखेला आम्ही त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणार आहोत. पक्षाचे नेतृत्व त्या करतील.'
प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाची चर्चांना ब्रेक लागल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले होते की, विलीनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही यावर चर्चा करू तसेच विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल.
विलीनीकरणाबाबात वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना सुरज चव्हाण यांनी सांगितले होते की, आम्ही दुःखात आहोत. त्यामुळे या विषयी आमची चर्चा झाली नाही. मात्र, विलीनकरणाबाबत सुनेत्रावहिनी पवार याच निर्णय घेतील.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबात रोहित पवार यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, अजितदादांसोबत आमची चर्चा झाली होती. आम्ही एकत्र येणार होतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव देखील निश्चित झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.