Pune Graduate MLC Election : पुणे पदवीधरमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराबद्दल प्रचंड सस्पेन्स : हर्षदा देशमुखांना AB फॉर्मच नाही, भैय्या मानेंच्या एन्ट्रीसाठी वेटिंग?

NCP candidate Pune Graduate News : पुणे पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमका अधिकृत उमेदवार कोण, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून बहुतांश मतदारसंघांतील उमेदवारही निश्चित झाले आहेत. मात्र, पुणे पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमका अधिकृत उमेदवार कोण, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून चर्चेत होते. मात्र, त्यांना अद्याप AB फॉर्म मिळालेला नसल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने पुणे पदवीधरच्या लढतीत नवा ट्विस्ट आला आहे.

विशेष म्हणजे, हर्षदा देशमुख यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मी उमेदवार असणार, एवढंच सांगते. बाकी आमचे नेते शरद पवार बोलतील. सगळ्या बाबतीत घोषणा पक्षश्रेष्ठी करतील,” अशी भूमिका मांडली. त्यामुळे हर्षदा देशमुख यांनी अर्ज दाखल केला असला तरी पक्षाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे.

Sharad Pawar
Rajya Sabha bypoll news : पक्षाची सत्ता जाताच खासदारकीचा राजीनामा, आता भाजपकडून तिकीट; विजय निश्चित...

गेल्या पाच वर्षांपासून आपण मतदार नोंदणीचे काम करत असल्याचेही हर्षदा देशमुख यांनी सांगितले. रयत संस्था आणि इतर संस्थांच्या माध्यमातून मतदार नोंदणीचे काम केल्याचा दावा त्यांनी केला. ही केवळ पदवीधरांची नव्हे, तर करदात्यांची निवडणूक असून करदात्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar
कोणत्याही पक्षाचे सदस्य नसताना 2008 पासून खासदार; कोण आहे हा मातब्बर नेता?

भैय्या माने यांच्या एन्ट्रीमुळे समीकरण बदललं?

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सुरुवातीपासून हर्षदा देशमुख यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता भैय्या माने यांच्या एन्ट्रीमुळे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटासमोर नवे समीकरण उभे राहिले आहे. भैय्या माने हे हसन मुश्रीफ यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. पुणे पदवीधरच्या उमेदवारीवरून मुश्रीफ आणि माने यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त यापूर्वी आले आहे. माने यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता आणि सुरुवातीला अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता त्यांच्या नावाची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनच चर्चा सुरू झाल्याने हर्षदा देशमुख विरुद्ध भैय्या माने अशी उमेदवारीची रस्सीखेच आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Sharad Pawar
कोणत्याही पक्षाचे सदस्य नसताना 2008 पासून खासदार; कोण आहे हा मातब्बर नेता?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाजपनेही (BJP) पुणे पदवीधर मतदारसंघात ऐनवेळी मोठा बदल केला आहे. शरद लाड यांच्याऐवजी डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात सुरुवातीला स्मिता जाधव विरुद्ध हर्षदा देशमुख अशी लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. पण आता भैय्या माने यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने या लढतीतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. हर्षदा देशमुखांनी अर्ज दाखल केला, पण AB फॉर्म मिळालेला नाही; भैय्या माने यांच्या एन्ट्रीमुळे शरद पवार गटाने अंतिम निर्णय रोखून धरला आहे का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असल्याने आता पुढील काही तासांत पुणे पदवीधर मतदारसंघातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षदा देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब होते की भैय्या माने यांना संधी मिळते, याचा सस्पेन्स अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com