

Rupali Chakankar Resigns: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडं सोपवला आहे. स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याचं महिला अत्याचार प्रकरण त्यांना भोवलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडं आपला राजीनामा सोपवण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमध्येच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये चाकणकरांनी त्यांना आयोगाच्यावतीनं अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाद्वारे योग्य प्रकारे तपास करण्याची विनंती केली होती. तत्पूर्वी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची देखील भेट घेऊन त्यांनाही महिला आयोगाच्यावतीनं या प्रकरणात सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली होती.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे विविध कार्यक्रमांतील फोटो समोर आले होते. अशोक खरात याचा पाद्यपुजन सोहळा हा चाकणकरांच्या हस्ते पार पडला होता. त्याचबरोबर एका जाहीर कार्यक्रमात चाकणकरांनी खरातचं कौतुक करताना त्याला थेट विठ्ठलाचाही दर्जा देऊ केला होता. सातत्यानं या भोंदू बाबाच्या संपर्कात चाकणकर असल्याचं सिद्ध झाल्यानं चाकणकर या सातत्यानं टीकेच्या धनी झाल्या होत्या. तसंच त्यांच्यावर विरोधकांसह भाजपच्या नेते मंडळींकडून देखील टीका होऊ लागली होती. तसंच त्यांच्याकडून राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता.
दरम्यान, शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेला स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु जो स्वतःला कॅप्टनं म्हणून संबोधायचा त्या अशोक खरातला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. त्याच्याजवळून पोलिसांना तब्बल ५८ हू्न अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत. या अशोक खरातच्या विविध कार्यक्रमात रुपाली चाकणकरांनी उपस्थिती लावल्याचं तसंच खरातच्या धार्मिक संस्थेवर चाकणकर या विश्वस्त म्हणून काम करत असल्यानं त्या टार्गेटवर आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.