

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून वीज ग्राहकांचं टेन्शन वाढवणारी चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र सुरू होती. केंद्र सरकारकडून नवीन राष्ट्रीय वीज धोरण मसुदा आणण्याच्या तयारीत आहे. वीज दरवाढीच्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला, तर आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये वीज बिल दरवर्षी महागाईच्या दरानं वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण याचदरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून शुक्रवारी (ता.27 मार्च) महावितरणच्या पाच वर्षांत वीजदर कपातीबाबतचा मांडलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आयोगानं यावेळी घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं महावितरणच्या पुनर्विचार याचिकेवर जनसुनावणी करून, नैसर्गिक न्याय तत्त्वाचं पालन करत व सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून आता आदेश देण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार, कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
महावितरणचं नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026 पासून सुरू होत असून वीज ग्राहकांना या वर्षात पूर्वीच्या दरापेक्षा अधिक सवलत मिळणार असल्याचं दिसून येत आहे. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी 9 ते दुपारी 5 या कालावधीसाठीच्या वीजवापरासाठी प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळत होती ती आता 85 पैसे प्रति युनिट इतकी सवलत असणार आहे.
उद्योगांना व व्यावसायिक वीज ग्राहकांना सकाळी 9 ते दुपारी 5 या वेळेत वीज वापरासाठीची टीओडी सवलत चालूच राहणार आहे. या ग्राहकांना वीजदरात एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 15 टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात 25 टक्के सूट मिळणार आहे.
तसेच यापूर्वी महिना 100 युनिटपर्यंत वीज ग्राहकांसाठीचा सरासरी दर 7 रुपये 31 पैसे इतका होता. तो आता 7 रुपये 10 पैसे असणार आहे. या ग्राहकांसाठीचा वीजदर पाच वर्षांत 26 टक्के इतका कमी होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक नव्या वर्षात 100 ते 300 युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी 13 रुपये 17 पैसे एवढा होता,आता तो 12 रुपये 94 पैसे असणार आहे. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर 10 रुपये 78 पैसे इतका होता. तो नव्या आर्थिक वर्षात 10 रुपये 71 पैसे इतका होणार आहे. सर्व वीज ग्राहकांसाठी वरीलप्रमाणे नवे दर लागू असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.