Anjali Damania : अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; केल्या 'या' मागण्या

Anjali Damania Meet CM Devendra Fadnavis : बीड जिल्ह्यातून अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना तक्रार करण्यासाठी हाॅट लाईन असावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे दमानिया यांनी केली.
Anjali Damania 1
Anjali Damania 1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Anjali Damania News: संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या तसेच बीडमधील शस्त्रपरवानाच्या गैरवापराबाबत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांकडे काय मागण्या केल्या ते सांगितले. त्या म्हणाल्या, संतोष देशमुख हत्ये प्रकरणात स्थापन केलेली एसआयटी रद्द करण्याची मागणी आहे. जी एसआयटी स्थापन केली आहे त्यामध्ये असलेले पोलिसांचे वाल्मिक कराड याच्याशी संबंध आहे. त्यामुळे एसआयटीकडून योग्य तपास होणार नाही. नवीन एसआयटी स्थापन करून जिल्ह्याच्या बाहेरील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिस त्यामध्ये असावेत.

Anjali Damania 1
Suresh Dhas On Pankaja Munde: सुरेश धसांचं आणखी एक खळबळजनक विधान, म्हणाले, 'पंकजा मुंडेंचा पराभव कराड अन्...'

बीड जिल्ह्यातून अनेक तक्रारी येत आहेत. आत्ता जे सुरेश धस, संदिप क्षीरसागर बोलत आहेत त्यांच्यावरही लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे नागरिकांना तक्रार करण्यासाठी हाॅट लाईन असावी, अशी दुसरी मागणी मुख्यमंत्र्यांकडे दमानिया यांनी केली.

बीड जिल्ह्यातील अनेक अधिकारी वर्षानुवर्ष एकाच जागेवर ठाण मांडून बसले आहेत. आत्ताच्या घटकेला बिंदू नामावली अधिकारी असावेत. अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या.

कराडची ऑन कॅमेरा चौकशी करा

पोलिस आणि सीआयडीवर सामन्य माणसांचा विश्वास राहिला नाही. वाल्मिक कराड याची ऑन कॅमेरा चौकशी केली जावी.तसेच तो जेथे राहतो आहे तेथे सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशी मागणी देखील दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बीज जिल्ह्यातील विना नंबरच्या गाड्या आहेत. तत्काळ जप्त करण्याची तसेच शस्त्र परवाने देखील पुन्हा तपासण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे.

मुंडेंना जनाची नाही तर मनाची...

चौकशीमध्ये दोषी आढळले तरच धनंजय मुंडे यांना राजीमान देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार सांगणार असल्याचे वृत्त आहे. त्याबाबत दमानिया यांनी मुंडेंनी यांनी मागणी न करताच राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांना जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे, असे म्हटले.

Anjali Damania 1
Santosh Deshmukh murder case : धारदार कत्तीसह हत्येसाठी वापरली 'ही' नऊ हत्यारं? क्रुरतेचा 'कळस'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant Patil
Maharashtra Live Politics Update
Central minister criticizes BJP government
dharashiv visit
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com