

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही दिवसापासून संघटनात्मक बदल केले जात आहेत. चार दिवसापूर्वी युवकाच्या संघटनेत नव्या नेत्यांना संधी दिल्यानंतर आता शरद पवार यांनी मोठ्या धक्कातंत्रांचा वापर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. आता लवकरच नव्या शिलेदाराची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यासोबतच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्ष यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून रणनीती ठरविण्यात येणार आहे.
येत्या काळात पक्षात काही बदल अपेक्षित आहेत. येत्या 15 व 16 ऑगस्टला राज्यातील जिल्हाध्यक्ष यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासोबतच आक्रमकपणे राज्यभर फिरणारे पदाधिकारी तयार करायचे आहेत. त्यासाठी पावले उचलली जात असल्याचे शशिकांत शिंदे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकाच्या संघटनेत चार दिवसापूर्वीच नव्या नेत्यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी येत्या काळात संघटनेत भाकरी फिरवली जाणार हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. येत्या काळात लवकरच नव्या प्रवक्त्त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
दरम्यान, चार दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात महत्त्वाचे बदल करीत युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बोर्डे यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली होती. तर पक्षाच्या युवक अध्यक्षपदाची विभागणी करून एक ग्रामीण आणि एक शहरी युवक अध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे. युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. युवा संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले होते.
दरम्यान, महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपद देताना देखील त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीणसाठी अध्यक्ष निवड करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरच्या युवती प्रदेशाध्यक्षापदी मनाली भिलारे तर ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्षा म्हणून अमृता कालदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवताना आता युवा चेहऱ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे आता प्रवक्ते निवडीवेळी काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.